पैसाच पैसा! गुरू ग्रहाच्या कृपेने ६ जूनपासून या चार राशींच्या लोकांना मिळणार सुख, समृद्धी अन् संपत्ती

ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाचे वर्षातून एकदा राशी परिवर्तन होते. सध्या गुरू वृषभ राशीमध्ये असून, ११ महिन्यांपर्यंत याच राशीत असणार आहे. ७ मे रोजी गुरूचा अस्त झाला होता, तसेच ६ जून रोजी गुरू ग्रहाचा उदय होणार आहे. गुरू ग्रहाचा उदय काही राशींच्या व्यक्तींना शुभ; तर काही राशीच्या व्यक्तींना अशुभ फळ देईल.

 

वृषभ

 

गुरू ग्रहाचा वृषभ राशीतच उदय होणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. त्यांना नवीन जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. अडकलेली कामे पूर्णत्वास जातील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशांत जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

 

कर्क

 

कर्क राशीच्या व्यक्तींनादेखील गुरू ग्रहाच्या उदयामुळे खूप अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.

 

सिंह

 

गुरू ग्रहाचा उदय सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही खूप खास ठरेल. या काळात तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. दूरचे प्रवास घडतील. उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

 

वृश्चिक

 

गुरू ग्रहाच्या उदयामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही अनेक फायदे होतील. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. मुलांसोबत आनंदी क्षण व्यतीत कराल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम असेल.

Leave a Comment