ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला वक्री असे म्हटले जाते. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते. शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून नवग्रहात न्यायप्रिय असलेले शनिदेव २९ जून रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी कुंभ राशीत वक्री होतील, जे १५ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे जवळपास पाच महिने वक्री असतील. शनिच्या वक्री होण्याने १२ राशींतील काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होण्याची शक्यता आहे, तर काही राशींसाठी अनेक समस्या उत्पन्न करणारे असेल.
ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात, अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते.
या राशींसाठी उद्भवणार समस्या
मेष
शनि वक्री होताच मेष राशीच्या लोकांना आयुष्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. या काळात आरोग्य समस्या उद्भवतील. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी वरिष्ठांचा सल्ला घ्या.
कन्या
कन्या राशीच्या लोकांनादेखील शनिच्या वक्री होण्याने अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागेल. कुटुंबात वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते. रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमचेच नुकसान होईल.
या राशींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
वृषभ
शनिदेवाची वक्री चाल वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
कुंभ
कुंभ ही शनिची स्वराशी असून शनिची वक्री चाल कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासूनची अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.