आता नुसती चांदी! १२ वर्षांनंतर शुक्र-गुरु करणार कमाल; पुढच्या २४ दिवसांत ‘या’ तीन राशी होणार मालामाल

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो, अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. सध्या शुक्र ग्रह मेष राशीत विराजमान आहे, जो येत्या १९ मे रोजी सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल.

 

शुक्राच्या वृषभ राशीतील प्रवेशाने वृषभ राशीत आधीपासून उपस्थित असलेल्या गुरु ग्रहासोबत त्याची युती निर्माण होईल. ही युती १२ जूनपर्यंत असेल. त्यामुळे या दिवसात १२ राशींपैकी काही राशींसाठी हा काळ अनुकूल सिद्ध होईल.

 

मेष

 

गुरु आणि शुक्राच्या वृषभ राशीतील प्रवेशाने मेष राशीच्या व्यक्तींना अनेक आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

 

कर्क

 

कर्क राशीमध्ये शुक्र चौथ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. स्वराशीत प्रवेश केल्यामुळे शुक्र कर्क राशीच्या अकराव्या घरामध्ये विराजमान होईल. तसेच शुक्र आणि गुरुच्या युतीमुळे कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

सिंह

 

गुरु आणि शुक्राच्या वृषभ राशीतील प्रवेशाने सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

Leave a Comment