पैसाच पैसा! अक्षय्य तृतीयेला बनणार ‘बुधादित्य अन् लक्ष्मीनारायण राजयोग’; ‘या’ राशींच्या लोकांचे दारिद्र्य संपणार

ज्योतिषशास्त्रानुसार काही ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रहाचे राशिपरिवर्तन होते. या राशिपरिवर्तनामुळे अनेकदा त्यांची इतर ग्रहांसोबत युती निर्माण होते; ज्यामुळे शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. या शुभ योग आणि राजयोगाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. शुक्रवारी (१० मे) अक्षय्य तृतीया असून, या दिवशी बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत आधीपासून सूर्य ग्रह स्थित आहे. त्यामुळे या राशीत बुध आणि सूर्याच्या युतीमुळे ‘बुधादित्य योग’ निर्माण होईल. तसेच या दिवशी ‘लक्ष्मीनारायण योग’ही आहे.

 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तयार झालेल्या या शुभ योग आणि राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या आपोआप दूर होण्यास मदत होईल. चला, तर मग कोणत्या आहेत या राशी ते आपण जाणून घेऊ.

 

मेष

 

या राशीमध्ये बुध आणि सूर्याची युती निर्माण होत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी हे योग खूप शुभ फळ देतील. या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रांतील व्यक्तींना यश मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल.

मिथुन

 

या राशीच्या व्यक्तींसाठीही बुधादित्य योग आणि लक्ष्मीनारायण योग उत्तम सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबातील वाद मिटतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल; तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल.

 

सिंह

 

या राशीच्या व्यक्तींकरिताही बुधादित्य योग आणि लक्ष्मीनारायण योग भाग्यकारक ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.

Leave a Comment