वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सुख आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो. शुक्र हा सौंदर्य, आनंद, वाहन, संपत्ती, कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे सर्व प्रकारच्या सुखात वाढ होते. आता शुक्रदेव नक्षत्र बदल करणार आहेत. येत्या ६ मे ला शुक्रदेव भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.
भरणी नक्षत्र खूपच शक्तीशाली आणि महत्त्वपूर्ण नक्षत्र मानले गेले आहे. भरणी नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र ग्रह आहे. त्यामुळे शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलाचा काही राशींना चांगला फायदा होऊ शकतो. त्यांना आयुष्यात अपार यश, सुख लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या…
‘या’ राशींचे भाग्य उजळणार?
मेष राशी
शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो. तुमचे प्रेम जीवन आनंदी राहू शकते. तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात.
मिथुन राशी
शुक्रदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. या राशीच्या लोकांना नोकरीत बढतीच्या नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही पैसेही वाचवू शकाल. तुमचं उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात.
सिंह राशी
शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तुमच्या व्यवसायालाही गती मिळू शकते. या राशीचे लोक परदेशात जाण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना जीवनात सुख-समृद्धी लाभू शकते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळू शकतो आणि पैसा आणि सन्मानही मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्रदेवाचे नक्षत्र परिवर्तन वरदानच ठरु शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते. जे लोक सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. जे विवाहित आहेत, त्यांच्यासाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.