सोनपावलांनी शनी ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार चमक; मे ते ऑगस्टमध्ये धनाने भरेल झोळी, आयुष्यात बदलाचा संकेत

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनी हे कर्म व न्याय देवता म्हणून ओळखले जातात. प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या कर्मानुरूप फळ देणारे शनी हे कलियुगातील दंडाधिकारी आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार, शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहेत. ६ एप्रिलला धनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश घेतला होता. आता मे महिन्यात शनी देव याच नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात गोचर करण्यासाठी सज्ज होणार आहेत.

वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार १२ मे रोजी सकाळी ८ वाजून ८ मिनिटांनी शनीचे पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात गोचर पूर्ण होईल. १८ ऑगस्टपर्यंत शनीदेव याच टप्प्यात भ्रमंती करणार आहेत. शनीचे नक्षत्र परिवर्तन मेषसहित तीन राशींसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होण्याची चिन्हे आहेत. या तीन राशींना धन- समृद्धी लाभू शकते असा अंदाज आहे, अशा या तीन राशी नेमक्या कोणत्या हे पाहूया..

 

शनी नक्षत्र परिवर्तन ‘या’ राशींचे उजळवणार भाग्य?

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शनीचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या मंडळींसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अचानक व अनपेक्षित माध्यमातून धनलाभ संभवतो. जर आपले पैसे कुठे अडकून राहिले असतील तर आपल्याला या कालावधीत ते पुन्हा प्राप्त होऊ शकतात. नोकरदार मंडळींचे काम पाहून येत्या काळात त्यांना पदोन्नती प्राप्त होऊ शकते. समाजातील मान- सन्मान वाढीस लागेल. आपण प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सक्षम व्हाल. आपल्याला गुंतवणुकीतून लाभ संभवतो.

 

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन शुभ वार्ता घेऊन येणार आहे. कामामध्ये नशिबाची खूप साथ लाभेल. अडकून पडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. व्यापाऱ्यांसाठी हा कालावधी फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. व्यवसाय वृद्धीचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. नोकरदारांना पगारवाढ हवी तशी लाभू शकते. कौटुंबिक नाती भक्कम होतील. आई- वडिलांची साथ लाभेल. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करु शकता. वाडवडिलांची संपत्ती तुम्हाला लाभ घडवून देऊ शकते.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

धनु राशीच्या मंडळींच्या नशिबात बदलाचे संकेत आहेत. नोकरीच्या निमित्ताने आपले कामाचे व वास्तव्याचे ठिकाण बदलू शकते. या बदलांसह फायद्याच्या संधी सुद्धा वाढू शकतात, ज्याच्यामुळे तुमच्या भविष्यात लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हा कालावधी अनुकूल आहे.

व्यापारी जर एखादे नवीन काम सुरु करू इच्छित असतील तर ही वेळ उत्तम आहे. १२ मे पासून आपल्याला विविध प्रकारच्या गोड बातम्या मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली सनदी चालून येईल. वैवाहिक जीवन सुख व शांतीचे असेल, विवाह इच्छुकांना सुद्धा चांगलं स्थळ सांगून येऊ शकतं.

Leave a Comment