वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा ग्रहांची युती होते. असंच येत्या काळात आता ग्रहांची युती होणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार गुरु आणि शुक्र वृषभ राशीत प्रवेश करतील. वृषभ राशीमध्ये शुक्र आणि गुरूचा संयोग १२ वर्षांनी होणार आहे.
ही युती मे महिन्यात होणार आहे. वृषभ राशीतील या दोन ग्रहांची युती तीन राशींसाठी अतिशय शुभ ठरु शकते. या राशींना भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना होणार धनलाभ?
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्राची युती अधिक फायदेशीर ठरु शकेल. यामुळे मेष राशीच्या लोकांना यावेळी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. अडकलेला पैसा तुमच्याकडे परत येऊ शकतो. या काळात तुमचा पगार वाढू शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. करिअरमध्ये तुम्ही भाग्यवान सिद्ध होऊ शकता. या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्राची युती लाभदायी ठरु शकते. कौटुंबिक नात्यात गोडवा राहू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. नोकरदारांचे पगार वाढू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात तुमची बचतही वाढू शकते. तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता. कार्यक्षेत्रात प्रगती आणि यश प्राप्त होऊ शकतो. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी, शुक्र आणि गुरूच्या संयोगाने करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. शुक्राच्या कृपेने सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुमच्या कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारु शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे