वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला देवगुरु आणि बृहस्पती असे म्हणतात. गुरु हळूहळू दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. सध्या गुरु मेष राशीत आहे. गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी गुरुने मेष राशीत प्रवेश केला होता. आता सुमारे १२ महिने आणि ८ दिवसांनी गुरु ग्रह आपल्या राशी बदलणार आहे. १ मे रोजी गुरु शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरुच्या शुभ स्थितीमळे जीवनात सुख समृद्धी नांदू शकते. गुरुच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते जाणून घेऊ…
कन्या
वृषभ राशीत गुरुच्या प्रवेशामुळे कन्या राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. तुमची रखडलेली कामे पुन्हा पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. करिअरमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक महत्त्वाच्या कामांची जबाबदारी मिळू शकते, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल, जीवनात सुख-समृद्धी येईल, कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठीही वृषभ राशीतील गुरुचे संक्रमण खूप फायदेशीर ठरू शकते. व्यापार क्षेत्रात तुम्हाला परदेशी करार मिळू शकतो. तुमचे जोडीदाराबरोबर सुरू असलेले मतभेद हळूहळू दूर होतील. गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठीही गुरुचा प्रवेश लाभदायक ठरू शकतो. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या बजेटकडे थोडं लक्ष ठेवा. या काळात नवीन कामाची सुरुवात शुभ राहील. वैवाहिक जीवनात गोडी निर्माण होण्याची शक्यता आहे.