होळीच्या दिवशी मुलांवरून ओवाळा ही वस्तू ;  मुलांचे सर्व संकटे दूर होतील, मुलांची प्रगती होईल..

मित्रांनो, आपण आपल्या परंपरेनुसार प्रत्येक सण साजरे करत असतो. जे आपल्या पूर्वजांपासून चालू झालेले आहेत. त्याप्रमाणे आपण ते सण साजरे करत असतो. होळीचा सण हा एक असा सण मानला जातो की, ज्यामधून वाईट शक्तींचा नायनाट करून नव्याने सुरुवात केलेली जाते. म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये आपण सर्व वाईट गोष्टी, वाईट कर्म यांचा नायनाट करू शकतो.

 

पुन्हा नव्याने सुरू करू शकतो. असे आपले पूर्वज आपल्याला सांगत आलेले आहेत. याच होळीमध्ये आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो उपाय कसा करावा व का करावा? हा उपाय कधी करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रत्येकाला असे वाटत असते की, आपले मूल नेहमी निरोगी रहावे. आपल्या मुलावर कोणताही प्रकारचे संकट येऊ नये. त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश यावे. तो प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये प्रगती करावा. असे सर्वच आई-वडिलांना वाटत असते. परंतु काही कारणांनी त्यांच्या मुलावर संकट येते. हे संकट जर आपल्याला टाळायचे असेल तर, आपल्याला होळीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे. की जेणेकरून आपल्या मुलांवर कोणताही प्रकारचे संकट येणार नाही.

 

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमची मुल केवढेही असले तरी चालू शकते. म्हणजेच ते मोठे असेल, लहान असेल तरी चालू शकते आणि त्यासाठी तुमचे मूल तुमचा जवळ असणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच तो दुसरा शहरात राहतो आणि तुम्ही दुसरीकडे राहता असे चालणार नाही. ते तुमच्याजवळ असले पाहिजे.

 

होळीच्या दिवशी आपल्या मुलांना आपल्या घरामध्ये खाली जमिनीवर बसायला सांगायचे आहे. मग आपले कितीही मुले असतील तर त्यांना सर्व जणांना बसायला लावायचे आणि यांच्या वरून आपल्या हाताच्या मुठी एवढे काळे तीळ घ्यावे. हे काळे तीळ आपल्या हाताच्या मुठीने एक एक प्रमाणे प्रत्येकांवरून ओवाळून घ्यावे. प्रत्येक मुलासाठी वेगळे तीळ घेण्याची गरज नाही.

 

असे हे आपण होळीच्या दिवशी सकाळ दुपार किंवा संध्याकाळ कधीही करू शकतो. फक्त होळी पेटण्याआधी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हे ओवाळलेले काळे तीळ आपण एका कागदामध्ये बांधून ठेवावे आणि ज्यावेळी आपण होळीची पूजा करतो त्यावेळी पूजा करून झाल्यानंतर हे तीळ त्या होळीमध्ये टाकावे.

 

असा हा साधा सोपा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. यामुळे नक्कीच तुमच्या मुलांवर आलेली सर्व संकटे निघून जातील. नकारात्मक शक्ती निघून जाईल. वाईट शक्तीचा जो काही प्रभाव असेल तो निघून जाईल. तुमच्या मुलाला प्रत्येक कामामध्ये यश येईल. तो चांगली प्रगती करेल व त्याचे आरोग्य देखील चांगले राहील.

 

अशा प्रकारे होळीच्या दिवशी तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी हा उपाय नक्की करून बघा. त्याचा फायदा झालेला तुम्हाला नक्कीच दिसून येईल.

Leave a Comment