वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह वैभव, धन, प्रेम व भौतिक सुखाचा कारक मानला जातो.मागील काही दिवसांपासून शुक्राने कुंभ राशीत राहून शनीसह युती केलेली आहे. ३१ मार्च शुक्र गोचर करून आपली उच्च रास मीनमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राचे उच्च राशीतील वास्तव्य एप्रिल महिन्यात काही राशींच्या नशिबाला वेगळीच कलाटणी देऊ शकते. एप्रिलचे ३० दिवस या राशींना चहूबाजूंनी धनलाभ व प्रगतीच्या संधी प्राप्त होऊ शकतात. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार असा योगायोग तब्बल एका वर्षाने जुळून आला आहे. शुक्राचे हे राशी परिवर्तन कोणत्या राशींचे नशीब बदलणार व कुणाला लाभ मिळवून देणार हे जाणून घेऊया..
शुक्राचे गोचर तुम्हाला जगू देईल राजासारखे जीवन
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीच्या मंडळींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. आपल्याला नोकरीच्या व प्रगतीच्या संधी लाभू शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढीचा संकेत आहे. व्यवसायात गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते ज्यामुळे कामाच्या प्रगतीत आलेले अडथळे दूर होऊ शकतात. बेरोजगारांना या कालावधीत नोकरीच्या संधी मिळणार आहे. फॅशन व ग्लॅमरसह संबंधित लोकांना या महिन्याभरात तुमच्या कामामुळे नव्याने ओळख लाभू शकते. वादातून तोडगा काढण्यात यश लाभेल.
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
कर्क राशीच्या मंडळींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन विविध स्वरूपात फायदेशीर सिद्ध होऊ शकते. या मंडळींचे नशीब शुक्राच्या ताऱ्यासारखे चमकण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुद्धा सुधार दिसून येऊ शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीच्या रूपात अचानक धनलाभ होऊ शकतो. आपल्याला नोकरी व व्यवसायात महत्त्वाचे संपर्क जोडता येतील ज्यांचा तुम्हाला वर्तमानासह भविष्यात सुद्धा लाभ होऊ शकतो. एखादी लहानशी यात्रा घडू शकते. जोडीदाराकडून पाठिंबा लाभेल.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत त्यामुळे शुक्राचे गोचर झाल्यावर जेव्हा शक्ती वाढेल तेव्हा या स्वराशीला शुक्र देव अधिक लाभ मिळवून देऊ शकतात. आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी मिळू शकते. साहस व पराक्रम वाढू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमची बाजू लक्षात येईल ज्यामुळे यापूर्वीचे मतभेद दूर होऊ शकतात. रिसर्च किंवा शिक्षण संबंधित क्षेत्रात यश हाती येऊ शकते. नशिबाची साथ लाभल्याने बेरोजगारांना नोकरीची व व्यावसायिकांना भांडवल जमा करण्याची महत्त्वाची संधी प्राप्त होईल. प्रेमात यश मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)