राहू, शुक्र आणि सूर्याचा १८ वर्षांनंतर त्रिग्रही योग; होळीनंतर ‘या’ राशींचे चमकेल नशीब; येऊ शकेल अमाप पैसा… !

वैदिक ज्योतिषानुसार, धन आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रह ३१ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत राहू आणि सूर्य आधीच स्थित आहेत. त्यामुळे सुमारे १८ वर्षांनी मीन राशीत शुक्र, राहू आणि सूर्याचा संयोग होत आहे. त्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. त्रिग्रही योगामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच, काहींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. चला जाणून घेऊ कोणत्या राशींना या त्रिग्रही योगाचा फायदा होऊ शकतो.
कुंभ
शुक्र, राहू आणि सूर्यदेवाचा संयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तसेच तुमच्या उत्पन्नाचे स्रोत आणखी वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही काही आर्थिक बचतदेखील करू शकाल. तुम्ही कोणाला दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. सामाजिक प्रतिष्ठाही वाढू शकते. तसेच, जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर तुम्ही एक मोठा व्यवसाय करार अंतिम करू शकता.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र, राहू आणि सूर्यदेव यांचे एकत्र येणे अनुकूल ठरू शकते. कारण- तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी हा संयोग तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ दिसू शकते. तसेच ऑफिसमध्ये कामाच्या संदर्भात जे काही निर्णय घ्याल, त्याचा फायदा होईल आणि प्रशंसा मिळेल. यावेळी गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. शेअर मार्केट, बेटिंग व लॉटरीमध्ये नफा होऊ शकतो. पण तुमचे पैसे हुशारीने गुंतवा.

मिथुन
हा त्रिग्रही योग मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात मिथुन राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. अनेक प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने तुमच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण येऊ शकतात. या काळात बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. तसेच व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही ज्या काही गोष्टींचा विचार करीत आहात, त्या करण्यात तुम्हाला यश मिळू शकेल.

Leave a Comment