वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतो. यानुसार आता ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहदेखील ठराविक काळानंतर कोणत्या ना कोणत्या राशीत प्रवेश करतो, ज्याचा १२ राशींच्या जीवनावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता, एकाग्रता, शेअर्स आणि आयटी क्षेत्राचा कारक म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह १५ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मीन रास बुध ग्रहाची सर्वात खालची राशी आहे. या राशीमध्ये १५ मार्च रोजी बुध ग्रहाचा उदय होत आहे. मीन राशीचा स्वामी मध्यभागी स्थित आहे. यामुळे नीचभांग नावाचा राजयोग तयार होत आहे. २६ मार्चपर्यंत बुध या राशीत राहील. यानंतर तो मेष राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना या ११ दिवसांमध्ये व्यवसायात भरभराट दिसून येऊ शकते. नोकरदारांना सर्वांगीण लाभ होऊ शकतो. पण, कोणत्या राशीला बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा फायदा होऊ शकतो जाणून घेऊया.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांना नीचभंग राजयोगामुळे विशेष लाभ मिळू शकतो. राजयोग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक पटींनी जास्त फळ मिळणार आहे. विविध गोष्टींत त्यांना नशीबपूर्ण साथ मिळू शकेल. बिघडलेली कामे पुन्हा पूर्ण मार्गी लागू शकतात. यासोबतच नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकेल. मकर राशीच्या सहाव्या भागात शनि आहे, ज्यामुळे खूप आर्थिक फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. बुद्धिमत्ता आणि लोकांशी बोलण्याशी संबंधित काम करणाऱ्या लोकांनाही मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. कर्जमुक्ती आणि न्यायालयीन खटल्यातून दिलासा मिळू शकतो.
तुळ राशी
येत्या ११ दिवसांत बुध तुळ राशीच्या लोकांवर धनवर्षाव करण्याची शक्यता आहे. तुळ राशीच्या लोकांनाही या काळात नशीबपूर्ण साथ मिळू शकेल. याचबरोबर तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. परदेशाशी संबंधित कोणतेही काम अपूर्ण असल्यास ते आता पूर्ण होऊ शकते. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांनाही लाभ मिळू शकतो. याचबरोबर करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थीही यश संपादन करू शकतात. सोशल मीडिया आणि ऑनलाइन कनेक्ट करून तुम्ही तुमचा व्यवसाय खूप वाढवू शकता. अनावश्यक खर्चापासून दूर राहू शकता. या काळात तुमचे आरोग्यही चांगले राहण्याची शक्यता आहे.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी नीचभांग योग फलदायी ठरू शकतो. या काळात कर्क राशीच्या लोकांना प्रचंड आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक गुंतवणुकीत तुम्हाला यश मिळू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. याचबरोबर तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुम्हाला परदेशात जाऊन कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्यातही यश मिळवू शकता. याशिवाय फिल्म इंडस्ट्री, मॉडेलिंग आणि सोशल मीडियाच्या क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे