नमस्कार मित्रांनो
मित्रांनो, आपला काही व्यापार असेल किंवा आपले कोणत्याही प्रकारचे दुकान असेल त्या दुकानात किंवा त्या व्यापारामध्ये किंवा त्या बिजनेस मध्ये आपल्याला म्हणावं तितका मोबदला मिळत नसेल, कामांमध्ये यश येत नसेल तर, आपण वेगवेगळे उपाय करत असतात. की ज्याने करून आपला व्यवसाय हा नीट सुरू होइल.
आपल्या व्यवसायात आपल्याला यश येईल. व्यवसाय मध्ये प्रगती होईल. म्हणूनच आज आपण एक असा उपाय आणला आहे की, ज्याच्या उच्चार केल्यामुळे आपल्याला आपल्या व्यापार मध्ये यश नक्कीच येईल. आपला व्यापार सुरळीत चालेल. व्यवसायामध्ये आपली प्रगती मोठ्या प्रमाणात होईल.
हा उपाय म्हणजे एक मंत्र आहे की, ज्या मंत्राचा उच्चारण आपण आपला व्यवसाय सुरू होण्याआधी करावा. म्हणजेच जर आपले दुकान असेल तर आपण दुकानात ज्यावेळी जातो दिवसाची सुरुवात करतो म्हणजे सकाळचा वेळेस. जर हा मंत्र बोलला तर, त्याचा फायदा आपल्याला थोड्याच दिवसात झालेला दिसून येतो.
जर तुम्ही घरूनच कोणत्यातरी व्यवसाय करत असाल तर, हा मंत्र घरामध्ये बोला. जर तुमचा कोणता तरी बिजनेस असेल तर हा मंत्र तुम्ही त्या बिझनेसचा ठिकाणी जाऊन बोला किंवा दुकान असेल तर दुकानात जाऊन सकाळी किंवा संध्याकाळी या मंत्राचे उपचार तुम्ही 21 वेळा 51 वेळा किंवा एक माळ म्हणजेच 108 वेळा दिवसातून एकदा नक्की करा.
त्याचा फायदा तुम्हाला हळूहळू झालेला नक्कीच दिसून येईल हा उपाय तुम्ही सकाळी व संध्याकाळी या दोन्ही वेळेस करू शकता. पण तुम्हाला सकाळी जर हा मंत्र जप काही कारणास्तव करता आला नाही तर, तो उपाय तुम्ही संध्याकाळी केला तरी चालू शकतो. परंतु जितका शक्य होईल तितक्या सकाळच्या वेळेसच केलेला चांगला.
हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये यश येईल. तुम्हाला पाहिजे असलेल्या मोबदल्यापेक्षा जास्त मोबदला मिळेल. याचा परिणाम तुम्हाला हळूहळू नक्कीच दिसू लागेल. हा मंत्र श्री महालक्ष्मी चा मंत्र आहे. ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते व तुमच्या असलेला व्यवसाय जोमाने चालू राहतो. तो मंत्र म्हणजे
“श्री शुक्ले महाशुक्ले कमल दल निवासे महालक्ष्म्यै नमो नमः”
असे या मंत्राचा जप तुम्ही दररोज 21 वेळा 51 वेळा किंवा 108 वेळा दररोज करा. नक्कीच त्याचा फायदा तुमच्या व्यवसाय मध्ये झालेला दिसून येईल. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल व तुमच्या कामांमध्ये यश येईल. तुमच्या व्यवसायामध्ये धनाची बरकत झालेली तुम्हाला दिसून येईल.
अशाप्रकारे या मंत्राचा जप तुम्ही नक्कीच करून बघा. त्याचा तुम्हाला परिणाम हळूहळू नक्कीच दिसून येईल.