१२ मार्च २०२४ ला फाल्गुन महिन्यातील द्वितीया व तृतीया तिथी एकत्र असणार आहे. फाल्गुन शुक्ल पक्षातील या तिथींना रेवती व आश्विनी नक्षत्र जागृत असेल. सकाळच्या वेळी शुक्ल योग तर दिवसभर ब्रह्म व इंद्र योग जुळून येणार आहेत. मंगळवारी मेष ते मीन पैकी कोणत्या राशीला कोणत्या रूपात लाभ व कष्टाचे संकेत आहेत हे जाणून घेऊया..
१२ मार्च २०२४: मेष ते मीन राशी भविष्य
मेष:-तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन मित्र जोडाल. झोपेची तक्रार जाणवेल. तरुण वर्गात अधिक वेळ घालवाल.
वृषभ:-व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. व्यावहारिक कल्पकता वापराल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा लागेल. काही बाबी उघडपणे बोलणे टाळाल. अधिकारी व्यक्तींची गाठ घ्यावी लागेल.
मिथुन:-मनातील आकांक्षा पूर्ण होतील. चांगली संगत लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्या लोकांच्या संगतीत वावराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
कर्क:-मानसिक ताणापासून दूर राहावे. घरातील वडीलधार्या व्यक्तींचे मत विरोधी वाटू शकते. अंगीभूत कलागुण विकसित होण्यास वाव द्यावा. अति विचार करणे टाळावे. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात.
सिंह:-जोडीदाराशी विचार-विनिमय कराल. भागीदारीत नवीन योजना आमलात आणाल. मुलांच्या हट्टीपणा कडे लक्ष ठेवा. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
कन्या:-पत्नीची प्रगती होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. जुगारातून लाभ संभवतो. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल.
तूळ:-पत्नीचा वरचष्मा राहील. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळचा प्रवास जपून करावा. कामाचा जोम वाढेल.
वृश्चिक:-बोलतांना सारासार विचार करून बोलावे. कसलाही उतावीळपणा करायला जाऊ नये. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे. घरात नातेवाईक जमा होतील. दिवस हसत-खेळत घालवाल.
धनू:-रागाचा पारा आवरता घ्यावा लागेल. आततायीपणे वागू नये. कामाचा जोम वाढीस लागेल. काही अनपेक्षित बदल संभवतात. नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे.
मकर:-सामुदायिक गोष्टीपासून दूर राहावे. स्त्रीवर्गापासून सावधानता बाळगावी. धार्मिक यात्रा कराल. प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. वादविवादात सामील होणे टाळा.
कुंभ:-मनमोकळ्या गप्पा मारता येतील. तुमच्या संभाषण कौशल्यावर सर्व खुश होतील. व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. हातातील कला जोपासावी.