१७ मार्चपर्यंत ‘या’ ५ राशींना शनी देणार धनसंपत्ती व प्रचंड यश; येत्या आठवड्यात तुमच्या राशीचा श्रीमंतीचा मार्ग कोणता?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पुढील आठवडा म्हणजे ११ ते १७ मार्च २०२४ हे सात दिवस हे ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे सिद्ध होणार आहेत. या कालावधीत अनेक महत्त्वाचे ग्रह आपली चाल बदलणार असल्याने १२ राशींवर कमी अधिक व शुभ- अशुभ स्वरूपातील प्रभाव दिसून येऊ शकतो.

ग्रहांचे सेनापती मंगळ या आठवड्यात शनीच्या स्वामित्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. मंगळ व शनीची युती झाल्याने १२ पैकी ५ राशींचे नशीब जोरावर असेल. या पाच राशी कोणत्या व त्यांना पुढील आठवड्यात कोणत्या स्वरूपात आर्थिक, शारीरिक व मानसिक लाभ होऊ शकतो हे पाहूया..

 

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीसाठी १७ मार्चपर्यंतचा कालावधी हा अत्यंत शुभ व लाभदायक सिद्ध होऊ शकतो. विशेषतः तुमचे वैवाहिक जीवन खूपच सुखाचे होईल. आपल्याला जोडीदाराची साथ लाभल्याने धनलाभाचे सुद्धा योग आहेत. मात्र लक्ष्मी ज्या मार्गाने येणार आहे त्याच मार्गाने पुन्हा खर्च सुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत. वेळीच आपण बचत किंवा गुंतवणुकीच्या मार्गावर पैसे वळल्यास मोठा लाभ होऊ शकतो. आरोग्यात सुधारणा होईल, जुनाट आजार नष्ट होतील.

 

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीला पुढच्या आठवड्यात नशिबाची तगडी साथ लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्याचे संकेत आहेत. तुमच्या आजवरच्या कामाचे कौतुक करून वरिष्ठ तुम्हाला प्रोत्साहन देतील यामुळे तुमचा कामाचा हुरूप वाढू शकतो. कौटुंबिक नाते संबंध सुधारतील. तुम्ही प्रत्यक्ष भांडणाचा भाग नसाल त्यामुळे घरगुती किंवा कामकाजाच्या प्रसंगांमध्ये मध्यस्थ म्हणून भूमिका पार पाडवी लागू शकते. आपली एखादी जुनी इच्छा या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. वाहन किंवा प्रॉपर्टीचे काम मार्गी लागू शकते.

 

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

तूळ राशीच्या मंडळींना इच्छापूर्ती घडवून देणारा हा पुढील आठवडा असणार आहे. नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला मोठा प्रवास घडू शकतो तसेच काहींच्या भाग्यात बदलीचे सुद्धा संकेत आहेत. विवाहच्छुक व्यक्तींना उत्तम जोडीदाराचे स्थळ सांगून येईल. प्रेम संबंधांना घरातून मान्यता मिळू शकते. आठवड्याच्या मध्यापासून शेवटपर्यंत आनंदी वातावरण असेल.

 

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीसाठी हा आठवडा ऊन- सावलीचा असला तरी फक्त बुद्धीच्या बळावर आपल्याला प्रचंड यश व धन प्राप्त करता येईल. याचे कारण म्हणजे आपल्याला निवांत असा वेळ कदाचित मिळणार नाही पण तुम्हाला तुम्ही केलेल्या धडपडीतून अनपेक्षित व अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारल्याने तुम्हाला समाजात एक वेगळी ओळख मिळू शकते. नोकरदारांना आपल्या संभाषण कौशल्यावर आधारित पदोन्नती मिळू शकते. बोलण्यापासून मागे हटू नका.

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

मीन राशीसाठी हा कालावधी शुभ असण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या राशीचा स्वामी स्वतः आपल्या कुंडलीच्या प्रभावी स्थानी भ्रमण करत आहे यामुळे आपल्याला शनी व मंगळ युतीतून अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होऊ शकतो. कुणावरही विश्वास ठेवण्याआधी आपल्या मनाचा कौल घ्या. धनलाभाचे नवे स्रोत आपल्या वाट्याला येऊ शकतात. नोकरदार मंडळींना विशेषतः महिलांना आपल्या जोडीदाराकडून मिळणारा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरेल. ध्येय पूर्ण झाल्याने आपल्याला लाभ मिळू शकतात/.

 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Leave a Comment