वर्षातील पहिल्या सूर्य अन् चंद्र ग्रहणामुळे या राशींचे बदलणार नशीब, मिळेल बक्कळ पैसा

खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून मार्च आणि एप्रिल महिना खूप खास आहे. कारण या महिन्यांमध्ये या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दिसून येणार आहे.वर्षातील पहिले चंद्रग्रहण २५ मार्च रोजी रविवारला दिसून येईल. या दिवशी होळीचा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. यानंतरच काही दिवसानंतर ८ एप्रिल सोमवारला वर्षाचे पहिले सुर्य ग्रहण दिसून येईल. या दिवशी चैत्र अमावस्या आहे. या दोन्ही ग्रहणामध्ये १५ दिवसांचे अंतर असेन.

 

सूर्यग्रहण म्हणजे काय?

जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्य एकाच सरळ रेषेत येतात आणि चंद्रामुळे सूर्य झाकला जातो तेव्हा सूर्यग्रहण लागतं. तुम्हाला माहीत असेल की, सूर्यग्रहणाचे खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती, असे तीन प्रकार आहेत.

 

चंद्रग्रहण म्हणजे काय ?

चंद्रग्रहणादरम्यान सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.चंद्रग्रहण हे छायाकल्प, खंडग्रास किंवा खग्रास असते.

 

हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाही पण ग्रहणाचा राशी चक्रातील काही राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम दिसून येईल. आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

 

मेष

राशीचक्रातील पहिल्या राशीसाठी या वर्षातील पहिले दोन्ही ग्रहण फायद्याचे ठरेल, असे दिसून येत आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या ग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांची व्यवसायात प्रगती दिसून येईल. नफ्यामध्ये वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल.

मिथुन

वर्षातील पहिले चंद्रग्रहण आणि त्यानंतर दिसणारे सूर्यग्रहण मिथुन राशीसाठी सुद्धा चांगले असणार आहे. या राशीच्या लोकांना या ग्रहणामुळे फायदा दिसून येईल. आर्थिक वृद्धी दिसून येईल. या लोकांना त्यांच्या अडकलेला पैसा मिळेन. आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. या राशीच्या लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे.

 

सिंह

२०२४ या वर्षातील दोन्ही ग्रहण सिंह राशीसाठी फायद्याचे ठरू शकते. या राशीच्या लोकांना दीर्घकाळापासून वाटेत येणाऱ्या समस्या किंवा अडचणी दूर होतील.हे लोक नव्या आयुष्याची नव्याने सुरूवात करतील. या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येईल. या लोकांना परदेशात प्रवासाचे योग दिसून येत आहे.

 

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Leave a Comment