महादेवाच्या कृपेने सिद्धी योगात तुम्ही काय कराल साध्य? तुमच्या राशीला धनलाभाचे संकेत आहेत का?

आज ४ मार्च २०२४ ला माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी व नवमी तिथी एकत्र जुळून आली आहे. या दिवशी पंचांगानुसार सिद्धी व वज्र योग सुद्धा सक्रिय असणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दुपारी १२ वाजून ९ मिनिटांपासून ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज ४ मार्च २०२४ मेष ते मीन राशीच्या नशिबात काय लिहिलेलं आहे हे पाहूया..

 

मेष:-नटण्याची हौस पूर्ण कराल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. प्रेमाच्या दृष्टीने नवीन मैत्री लाभेल. सर्वांशी मधुर वाणीने बोलाल.

 

वृषभ:-प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कामात चंचलता आड येऊ शकते. भावंडांची बाजू जाणून घ्यावी. प्रकृतीची किरकोळ तक्रार जाणवेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

 

मिथुन:- मुलांच्या वेगळ्या खर्चाचे नियोजन करावे. घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल. काहीसे छांदीष्टपणे वागाल. करमणुकीसाठी अधिक वेळ घालवाल.

 

कर्क:-उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील ज्येष्ठांची मदत होईल. मनाचा सज्जनपणा दाखवाल. हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

 

सिंह:-दूरच्या प्रवासाचा योग येईल. मनातील निराशा बाजूस सारावी. चंचलतेत वाढ होऊ शकते. जवळचे मित्र भेटतील. भावंडांच्या समस्या समजून घ्याल.

 

 

Leave a Comment