राशिभविष्य : सोमवार दि. 4 मार्च २०२४

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 4 March 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना

मेष
आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायक ठरेल. जुन्या गुंतवणूकीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. नियोजन करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या. प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. जर तुम्हाला आज कोणाला प्रपोज करायचे असेल तर आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही मोकळ्या मनाने बोलाल. इतरांच्या समस्याही समजून घेण्याचा प्रयत्न कराल.

महावितरणमध्ये मेगा भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, अशी होणार थेट उमेदवाराची निवड

लो सिबिल स्कोर : तरीही मिळेल एक लाखापर्यंतचे कर्ज : low cibill score Loan

वृषभ

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम ठरले. सामाजिक कार्यात तुमचं मन रमेल. विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीदेखील आजचा दिवस अनुकूल आहे. शिक्षकांकडूनही तुम्हाला अभ्यासात पूर्ण मदत मिळेल. आज तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार कराल. पण चालताना कालजी घ्या , जपून चाला, आज पाय लचकून दुखापत होऊ शकते. मंदिरात गुळाचे दान करा, व्यवसायात आर्थिक लाभ होईल.

मिथुन

आज मानसिक ताणाचा सामना करावा लागू शकतो. भविष्याबद्दलही चिंता सतावेल. रोजच्या कामांतही तुमचं मन लागणार नाही. थोडी सुस्ती येऊ शकते. मुलांसोबत काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही समस्या सोडवताना शांतपणे, बसून बोला आणि तो वाद सोडवा. मन संवेदनशील होऊ शकते. प्रवास करताना काळजी घ्या, पर्स शांभाळा. आज नव्या कामात तुमचे मन गुंतेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

आयपीएलमधील ‘या’ टीमच्या क्रिकेटपटूचा भीषण बाईक अपघात, स्पर्धा सुरु होण्याआधीच झटका

कर्क

आजचा दिवस बरा-वाईट असा संमिश्र असेल. तुमची सर्व काम मनाप्रमाणे पार पडतील. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. कला-क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा प्लान ठरू शकतो. तसेच कोणावरही आपले विचार थोपवू नका. काही सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात.

येत्या दोन महिन्यात माता लक्ष्मी ‘या’ ५ राशींना देणार अपार धन? ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने गडगंज श्रीमंती कोणाच्या नशिबात?

सिंह

आजचा दिवस बरा राहील. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लान ठरेल. पण तुमच्या आर्थिक परिस्थिती चढ-उतार येऊ शकतात. काही काळासाठी तुम्हाला थोडी जास्त धावपळ करावी लागू शकते. एखाद्या अनोळखी व्यक्तीमुळे मूडही खराब होऊ शकतो. जोडीदाराशी चांगले संबंध निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक लाभाचे काही नवीन स्रोत मिळू शकतात, परंतु पैशाचे व्यवहार तुम्ही टाळावेत. अनाथाश्रमातील मुलांना काहीतरी गिफ्ट द्या, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कन्या

आजचा दिवस अनुकूल राहील. बराच वेळ अडकून पडलेलं काम मार्गी लागण्यात तुम्हाला मित्रांची मदत मिळू शकेल. तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकेल. तुमच्यावर अंगावर काही नवीन जबाबदाऱ्या पडतील, ज्या तुम्ही यशस्वीपण पूर्ण करू शकाल. आधी केलेल्या काही चांगल्या कामांचाही तुम्हाला फायदा मिळू शकतो. करिअरमध्ये प्रगती होईल. कोणताही अडथळा येणार नाही. ऑफिसमधील लोकांचे सहकार्य मिळत राहील. कामाबाबत काही नवीन कल्पना तुमच्या मनात येतील. तुम्ही नवीन योजना आखू शकता. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील

१८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?

तूळ

आजचा दिवस संमिश्र राहील. एखादा मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो. व्यापाऱ्यांना मोठा फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. तुमच्या बुद्धीमुळे सर्व प्रकारच्या संकटांपासून दूर राहण्यास मदत होईल. कौटुंबिक कामामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते, त्यामुळे थकवा जाणवू शकतो. कामात नवे बदल करणे टाळा. पक्ष्यांना खाणं द्या. कौटुंबिक वाद संपुष्टात येतील.

वृश्चिक

आजचा दिवस चांगला जाईल. संध्याकाळपर्यंत घरात आनंदाचे वातावरण असेल. नातेवाईकांच्या सतत भेटी होतील. आरोग्य चांगले, तंदुरुस्त राहील. या राशीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. इतर लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. घरच्यांशी बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. वर्गमित्रांशी संबंध चांगले राहतील.

धनु

आजचा दिवस उत्तम जाईल. बाहेर जाताना मित्रमंडळींशी भेट होईल, त्यामुळे मन प्रसन्न होईल. ऑफीसमध्ये कामातील आत्मविश्वास पाहून बॉस खुश होईल. नव्या कामाची सुरूवात करायचा विचार असेल तर (भविष्यात) तुमचा फायदा होईल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. आनंदात वाढ होईल. व्यावसायिक बाबतीत काही अनुभवी लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. तुमच्या अधिष्ठात्या देवतेला नमस्कार करा, दिवसभर सर्व कामे नीट होतील.

Flipkart ने लाँच केली UPI सेवा; PhonePe, Amazon Pay UPI ला देणार टक्कर

मकर

दिवस बरा जाईल. प्रगतीत काही अडथळे येऊ शकतात. यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. कुटुंबात सुख-शांती राही. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जायचा प्लान ठरू शकतो. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. समाजातील एखाद्या व्यक्तीशी तुमचे काही मतभेद असू शकतात. निरुपयोगी गोष्टी बोलणे टाळलेले बरे. प्रवास करताना नीट काळजी घ्या.

कुंभ

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या क्षमतेने कामं सहज पूर्ण कराल. आर्थिक लाभात लक्षणीय वाढ होईल. वैवाहिक जीवनात परस्पर सामंजस्य चांगले राहील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला उत्साही वाटेल. करिअरमध्ये प्रगती करण्याची चांगली संधी मिळेल. नवीन लोकांशी भेटणे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्यात खूप आत्मविश्वास असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मीन

तुमची शक्ती चांगल्या कामात वापरू शकता. सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकतो. शैक्षणिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. मात्र विद्यार्थ्यांसाठी काळ थोडा अनुकूल राहील. आज तुम्ही तुमच्या अभ्यासाबद्दल चिंता वाढू शकेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकते. घरात उत्सवाचे वातावरण असू शकते. तसेच काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बदल घडवून आणू शकता. तुम्ही इतरांचे म्हणणे गांभीर्याने ऐकण्याचा प्रयत्न करा.

Leave a Comment