संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय, गणपतीच्या कृपेने दूर होतील सर्व विघ्न

पंचांगानुसार, दर महिन्याला दोन वेळा चतुर्थी तिथी येते. एक म्हणजे शुक्ल पक्षात तर दुसरी चतुर्थी तिथी कृष्ण पक्षात साजरी होते. त्यानुसार, माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी होत आहे.हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे. ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपतीला समर्पित असून या दिवशी गणपतीच्या विधिवत पूजेसह काही उपाय करणे अत्यंत लाभदायी ठरते. त्यानुसार, जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय केले पाहिजे याविषयी माहिती. 

 

संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय

 

पंचांगानुसार, माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 01 वाजून 53 मिनिटांनी सुरू होईल. तर 29 फेब्रुवारी रोजी पहाटे 04 वाजून 18 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारीला साजरी होईल. या दिवशी काही सोपे उपाय करुन गणपतीची कृपा प्राप्त करता येते.

 

श्रीयंत्र आणि सुपारीतुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घेऊन त्यात श्रीयंत्र आणि मधे सुपारी ठेवावी. त्यानंतर गणपतीची पूजा करुन हे श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. या उपायाने संपत्तीत वाढ होते.

 

सुपारी आणि वेलची

 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर दोन सुपारी आणि दोन वेलची ठेवून त्याची पूजा करा. या उपायाने विघ्नहर्ता गणपती प्रसन्न होत भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात.

 

या मंत्राचा जप करा

 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ‘ओम गं गणपतये नमः’ चा मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने तुम्हाला कुशाग्र बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण आणि श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळू शकतो.

चंद्र देवाला जल अर्पण

 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात लाल चंदन, कुश, फुले, अक्षदा इत्यादी टाकून चंद्राला अर्घ्य द्यावे. असे केल्याने तुमच्या कुटुंबावर चंद्रदेवाची कृपा होईल.

 

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. Times Now Marathi या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

Leave a Comment