माघ पौर्णिमेला धन, शक्तीसह अद्भुत योग बनल्याने ‘या’ राशींच्या दारी येईल माता लक्ष्मी; सोन्यानाण्याने उजळेल नशीब

उद्या म्हणजेच २४ फेब्रुवारी २०२४ ला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. आज २३ फेब्रुवारीलाच दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ होत आहे. पौर्णिमेला व त्यातही माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो. यंदा माघ पौर्णिमेला तब्बल १३ वर्षांनी काही अत्यंत दुर्लभ व अद्भुत राजयोग तयार होत आहेत. सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे धनशक्ती योग हा मकर राशीत मंगळ व शुक्राच्या युतीने तयार होत आहे. हा योग सुद्धा साधारण पाच वर्षांनी निर्माण होत आहे.

मंगळ हा आपली उच्च राशी मकर मध्ये असल्याने यामुळे रुचक योग सुद्धा तयार होत आहे. कुंभ राशीमध्ये सूर्य व बुधाचा प्रभाव एकत्र आल्याने बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे तर कुंभ राशीत विराजमान शनीमुळे शश राजयोग निर्माण होत आहे. माघ पौर्णिमेला चंद्र स्वतः सिंह राशीत असणार आहे. माघ पौर्णिमेला एकाच वेळी इतके योग बनल्याने येत्या काळात वेगवेगळ्या राशींना प्रचंड मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. या राशींच्या घरी स्वतः माता लक्ष्मी सोन्या नाण्याची संपत्ती घेऊन येऊ शकते असेही म्हणता येईल. नक्की कोणाच्या कुंडलीत हे राजयोग प्रभावी असणार हे पाहूया..

 

माघ पौर्णिमेपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन होतील सुरु

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीत धनशक्ती राजयोग कुंडलीच्या दहाव्या स्थानी तर बुधादित्य व शश राजयोग अकराव्या स्थानी निर्माण होत आहे. यामुळे येत्या काळात अचानक धन संपत्तीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. नव्या नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात. आपला समाजातील मान- सन्मान वाढीस लागू शकतो. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचा या कालावधीत मोठा सन्मान होऊ शकतो. वाणीच्या बळावर अनेकांची मने जिंकून घेऊ शकता. कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. दगदग होऊ शकते पण हा कालावधी तुमच्यासाठी भविष्यातील अनेक फायदे घेऊन येऊ शकतो त्यामुळे ताण- तणावाचा सामना करण्यासाठी तयार रहा.

 

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

माघ पौर्णिमेच्या दिवशी बनणारे राजयोग कन्या राशींच्या हिताचे असणार आहेत. अध्यात्म व मानसिक शांतीच्या प्राप्तीकडे आपला कल वाढेल. भांडणे टाळावीत. आपल्या आयुष्यात विविध रूपातून सुख येऊ शकते. आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढतील. तुमच्या कामाचे कौतुक होऊन तुम्हाला पदोन्नती लाभू शकते. जबाबदारी स्वीकारताना आपण आपल्या मनाचा कल विचारात घ्यावा. करिअरच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घ्याल ज्याचा भविष्यावर मोठा प्रभाव दिसून येईल. माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहू शकते. लग्नाचा प्रस्ताव येईल.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

माघ पौर्णिमेला चंद्र आपल्याच राशीत भ्रमण करणार आहे. धन शक्ती योग बनल्याने सिंह राशीच्या मंडळींना धन- ऐश्वर्याची प्राप्ती होऊ शकते. काम व शिक्षण दोन्ही बाबींमध्ये आपल्याला लाभ होऊ शकतो. आरोग्यात सुधारणा होईल. तुम्हाला वाडवडिलांनी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा लाभ होऊ शकतो. बुद्धीच्या बळावर तुम्हाला संकटातून मार्ग शोधावा लागणार आहे. ग्रहांचे पाठबळ मिळाल्याने मार्ग सुकर होईल.

Leave a Comment