मार्च महिना ग्रहांच्या स्थितीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मार्चमध्ये केवळ शनि आणि सूर्याची स्थिती बदलणार नाही तर शुक्र, मंगळ आणि बुध यांसारखे अनेक ग्रहही इतर राशींमध्ये मार्गक्रमण करणार आहेत. ग्रहांच्या स्थितीतील हे मोठे बदल सर्व राशींवरही परिणाम करतील. एकीकडे 7 मार्चला बुध मीन राशीत प्रवेश करेल, दुसरीकडे त्याच दिवशी शुक्र देखील कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 14 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करेल आणि तिथे तो बुधासोबत संयोग करेल. 15 मार्चला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत अस्त असलेल्या शनीचा (Shani) 18 मार्चला पुन्हा उदय होईल.अनेक ग्रहांच्या स्थितीतील होत असलेले बदल मार्च महिना खूप खास बनवणार आहेत. ग्रहांच्या या बदलाचा सर्व राशींवर काय परिणाम होणार आहे आणि कोणत्या राशींना या बदलांचा फायदा होणार आहे ते जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीसाठी मार्च महिना खूप खास ठरणार आहे. वृषभ राशीचे लोक महिनाभर उर्जेने परिपूर्ण असतील आणि त्यांना सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. घरात आनंदाचं वातावरण राहील आणि काही शुभ कार्यक्रम होण्याची देखील शक्यता आहे. नोकरदार लोकांना या काळात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात संपत्ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतील आणि आर्थिक प्रगतीची देखील शक्यता आहे.
कर्क रास (Cancer)
शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना मार्चमध्ये यश मिळेल. तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरीसाठी परदेशात जायचं असेल तर यश मिळेल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा महिना शुभ आहे. अविवाहित लोकांच्या विवाहाची शक्यता आहे. तुम्हाला सरकारी लोक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल आणि व्यवसायातही फायदा होईल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिना अनेक चांगले बदल घेऊन येत आहे. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना बरेच फायदे होतील, त्यांचे भागीदारांसोबतचे संबंध अधिक चांगले होतील आणि याचा फायदा व्यवसायात होऊ शकतो. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला या महिन्यात तुमच्या आयुष्याचा जोडीदार मिळू शकेल. या महिन्यात तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुम्ही तुमची सर्व कामं तुम्ही पूर्ण उर्जेने पूर्ण करू शकाल. तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि या महिन्यात तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. या महिन्यात तुम्ही केलेला प्रवास फलदायी ठरेल.
कन्या रास (Virgo)
या महिन्यात कन्या राशीच्या लोकांच्या मार्गात अडथळे येणार नाहीत आणि आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील वातावरण चांगलं राहील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम राहील. सुख-सुविधा वाढतील आणि सामाजिक कार्यक्रमात सहभाग वाढेल. मुलं शिक्षणाकडे चांगली वाटचाल करतील आणि त्यांना त्याचे शुभ परिणामही मिळतील. नोकरदारांना चांगली बातमी मिळेल, नोकरीत त्यांची प्रतिमा देखील वाढेल. धार्मिक कार्याच्या दृष्टीनेही हा महिना तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना लाभदायी ठरेल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळेल. या महिन्यात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या महिन्यात लाभ मिळेल. या महिन्यात तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण कराल. जुन्या कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळू शकते आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात.