महाशिवरात्री ८ की ९ मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने शिव मंदिरांत मोठी सजावट केली जाते. अनेक जण घरी किंवा मंदिरात रुद्राभिषेक आणि शिव उपासना करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री उत्सव दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो.

या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे. शिवपुराणानुसार या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. याचबरोबर त्यांनी संन्यासाचे जीवन सोडून गृहस्थाचे जीवन सुरू केले अशी आख्यायिका सांगितली जाते. यामुळे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे.

यंदाच्या वर्षात महाशिवरात्री कधी आहे, याची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
महाशिवरात्री २०२४ तिथी (Mahashivratri 2024 Tithi)
फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीची सुरुवात – ८ मार्च रोजी रात्री ०९.५७ वाजता सुरू होईल.फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीची समाप्ती – ९ मार्च संध्याकाळी ०६.१७ पर्यंत.महाशिवरात्रीची अचूक तारीख- ८ मार्च २०२४.

महाशिवरात्री २०२४ पुजेचा मुहूर्त (Mahashivratri 2024 Puja Muhurat)
महाशिवरात्रीच्या निशिता पूजेची वेळ – रात्री उशिरा १२.०७ ते १२.५६ मिनिटांपर्यंत.

निशिता काल पूजेची वेळ : ९ मार्च रोजी दुपारी १२.१३ ते ०१.०१ मिनिटांपर्यंत

रात्री प्रथम प्रहर पूजा वेळ : संध्याकाळी ६.२९ ते रात्री ९.३३ मिनिटांपर्यंत.

रात्रीची दुसरी प्रहर पूजा वेळ: ८ मार्च रोजी सकाळी ९.३३ मिनिटे ते ९ मार्च रोजी १२.३७ मिनिटांपर्यंत.

रात्री तृतीया प्रहर पूजा वेळ: ९ मार्च रोजी सकाळी १२.३७ ते पहाटे ३.४० मिनिटांपर्यंत.

रात्री चतुर्थ प्रहर पूजा वेळ : ९ मार्च सकाळी ३:४० ते सकाळी ६:४४ मिनिटांपर्यंत.

महाशिवरात्री २०२४ शुभ योग (Mahashivratri 2024 Shubh Yog)
हिंदू कॅलेंडरनुसार, या दिवशी सकाळपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सकाळी ६.४५ ते १०.४१ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल. याशिवाय ९ मार्च रोजी पहाटे ४.४५ ते १२.४५ या वेळेत शिवयोग होणार आहे.

महाशिवरात्री २०२४ पारण वेळ (Mahashivratri 2024 Paran Time)
महाशिवरात्री पारणाची वेळ ९ मार्च रोजी सकाळी ६.४४ ते ६.१८ मिनिटांपर्यंत आहे.

Leave a Comment