आपल्या जीवनात ग्रह आणि तारे यांचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे व्यक्तीच्या नशिबात बदल होतात. यापैकी सूर्यग्रहण (Solar Eclipse) आणि चंद्रग्रहण खूप महत्वाचे आहेत. सन 2024 मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यासारख्या खगोलीय घटना 4 वेळा दिसणार आहेत. यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होतील. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होते. वर्षातील पहिले सूर्यग्रहण केव्हा होईल आणि ते कुठे दिसेल हे जाणून घेऊया.2024 सालातील पहिले सूर्यग्रहण कधी आहे?
2024 सालातील पहिले सूर्यग्रहण सोमवार, 8 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. पहिल्या सूर्यग्रहणाची वेळ – ते 8 एप्रिल रोजी रात्री 09:12 ते 01:25 पर्यंत असेल. अशा प्रकारे सूर्यग्रहणाची एकूण वेळ 4 तास 39 मिनिटे असेल.
वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी?
वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला होणार आहे. त्याचा सुतक कालावधी 8 एप्रिल रोजी सकाळी 9.12 वाजता सुरू होईल.ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो. तथापि, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही.वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार?
भारतात सोमवार, 8 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण तुम्हाला पाहता येणार नाही. हे सूर्यग्रहण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव, उत्तर अमेरिका, नैऋत्य युरोप, दक्षिण अमेरिका, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर दिसणार आहे.
सूर्यग्रहण काळात काय करू नये?
सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये, तसेच सूर्यग्रहण कधीच डोळ्यांनी पाहू नये, असे सांगितले जाते. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी गच्चीवर जाऊ नये. तसेच ग्रहणकाळात शिवणकाम व विणकाम करू नये. या काळात नखे कापू नयेत. मंदिरात ठेवलेल्या देवाच्या मूर्तीला हात लावू नयेत पण इच्छा असल्यास मंत्रजप करू शकता. ग्रहणकाळात स्वयंपाक वगैरे करू नये.