नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असलेल्या व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे. या व्यक्ती आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन व्यवसाय सुरू करू शकतात. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.
अशा ठिकाणी तुमची प्रभावशाली लोकांशी भेट होईल. लव्ह लाइफमध्ये, जोडीदारासोबत बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतो. वाद झाला तर तो दीर्घकाळ टिकेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत समाधानी असाल. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळेल. संध्याकाळी एखाद्या नातेवाईकांच्या घरी पूजेला उपस्थित रहाल.
वृषभ (Taurus) : दिवस थोडा त्रासदायक असेल. कारण व्यवसायातील काही जुन्या समस्यांमुळे चिंतेत रहाल. त्यामुळे कामात देखील अडथळे येतील. पण समस्या दूर करण्यासाठी कठोर परिश्रम घ्याल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची मदत घेण्याचा विचार कराल. अनावश्यक खर्चावर ब्रेक लावावा लागेल अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. ज्या व्यक्तींनी सट्टेबाजीत पैसे गुंतवण्याची इच्छा आहे, ते गुंतवू शकतात. कारण त्यातून आज चांगला नफा मिळेल. प्रवासात वाहन जपून चालवा नाहीतर अपघात होण्याचा धोका आहे.
मिथुन (Gemini) : लव्ह लाइफमधल्या व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे. कारण आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून प्रेमाला मान्यता मिळेल आणि त्यामुळे त्यांचा पुढचा मार्गही मोकळा होईल. न्यायालयात एखाद्या प्रकरणाबाबत वाद सुरू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. व्यवसायात कोणत्याही नवीन व्यक्तीला भागीदार बनवणं टाळा. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करा. जर विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले तरच त्यांना परीक्षेत यश मिळू शकेल. तुम्हाला सासरच्या व्यक्तींकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
कर्क (Cancer) : आज तुम्हाला आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागेल. एखादा जुनाट आजार पुन्हा उद्भवल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कार्यक्षेत्रातील गुप्तशत्रूपासून सावध रहा. कदाचित ते तुमचे मित्र देखील असू शकतात. ते तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सावधगिरी बाळगत कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. कोणाकडूनही पैसे उधार घेणं टाळा.
सिंह (Leo) : विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. त्यांनी कच्च्या विषयावर परिश्रम घेतले तर त्यांना यश मिळेल. यात त्यांना शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदार व्यक्तींना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तसेच त्यांना वरिष्ठ फटकारू शकतात. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला घ्या. आज तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह निश्चित होऊ शकतो. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. जे लोक दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना आज यश मिळेल.कन्या (Virgo) : आज प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या आईची साथ मिळेल. मालमत्ता खरेदीसाठी दिवस चांगला आहे. जोडीदाराशी बोलताना भावनेच्याभरात सर्व गोष्टी सांगू नका, अन्यथा तुमची एखादी समस्या जोडीदाराला समजेल. वाढत्या खर्चामुळे त्रस्त रहाल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल मात्र त्यात यश मिळणार नाही. भविष्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे थोडं दुःख वाटेल. कारण हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी गोड बोला.
तूळ (Libra) : दिवस मध्यम फलदायी असेल. तुम्हाला ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील तरच यश मिळेल. आज तुम्ही नवीन मित्र बनवू शकता. पण त्यांच्याशी बोलताना सावधगिरी बाळगा. तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करू नका. अन्यथा ते तुमच्या गोष्टी इतरांना सांगतील. कुटुंबीयांसह नातेवाईकांकडे जाऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला एखादी प्रभावशाली व्यक्ती भेटेल आणि ती तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. आज बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा.
वृश्चिक (Scorpio) : दिवस तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा असेल. तुम्ही उत्साहामुळे कोणतंही काम पूर्ण करू शकाल. तसेच रखडलेली कामं देखील पूर्ण होतील. आळस दूर करून पुढे जाल. त्यामुळे व्यवसायातील तुमचे शत्रूही त्रस्त होतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कठोर परिश्रमानंतर तुम्हाला इच्छेनुसार पैसे मिळतील. त्यामुळे मनाला समाधान मिळेल. जोडीदाराशी तुमचं नातं गोड राहील.
धनू (Sagittarius) : कुटुंबात उत्सवाचं वातावरण असेल. एखादा नातेवाईक आज घरी येईल. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त राहतील. यासाठी तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. पण त्यातून तुम्हाला समाधान मिळेल. व्यवसायात नफा मिळाल्याने तुम्ही सर्व खर्च भरून काढू शकाल. व्यवसायात विविध स्रोतांतून पैसे मिळू शकतात. जोडीदारासोबत तुमच्या मुलांसाठी काही अत्यावश्यक वस्तू किंवा दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी जाल. संध्याकाळी मित्रांसोबत सहलीला जाण्याचा प्लॅन आखू शकता.
मकर (Capricorn) : सर्व क्षेत्रात निराशाजनक रिझल्ट मिळतील. त्यामुळे कोणतंही नवीन काम करणं टाळा. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणींना सामोरं जावं लागेल. जुने वाद संपल्याने कौटुंबिक जीवन आनंदमय असेल. व्यवसायात अपेक्षित नफा न मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. त्यामुळे खर्चाकडे बारीक लक्ष द्यावं लागेल अन्यथा भविष्यासाठी ठेवलेले बचतीचे पैसे खर्च करावे लागू शकतात. पण असं करणं टाळा नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल.
कुंभ (Aquarius) : दिवस तुमच्यासाठी खास असेल कारण आज तुम्ही कठीण प्रसंगावर सहज मात कराल. सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. कारण कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत अचानक बिघडू शकते आणि त्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. नोकरदार बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व समस्या सहजपणे सोडवतील. ज्या व्यक्ती नवीन व्यवसायाची योजना आखत आहेत, त्यांनी काही काळ प्रतीक्षा करावी.
मीन (Pisces) : दिवस भाग्यशाली आहे. समाजात मानसन्मान मिळेल. सट्टेबाजांनी पैसे सावधपणे गुंतवावेत अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. नाहीतर नंतर त्यामुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या मुलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा द्याल. जेणेकरून ते त्यांच्या समस्या सहजपणे सोडवू शकतील. संध्याकाळी तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला जाल.