वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला ग्रह आपली स्थिती बदलत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सुख आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो.
१२ फेब्रुवारीला शुक्राने मकर राशीत प्रवेश केला असून तिथे तो ६ मार्चपर्यंत असणार आहे. शुक्र हा सौंदर्य, आनंद, वाहन, संपत्ती, कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे माणसाला सर्व प्रकारच्या सुखात वाढ होते. जाणून घेऊया शुक्र मकर राशीत प्रवेश झाल्याने कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.
‘या’ राशींना धनलाभ होण्याचे योग?
मेष राशी
शुक्र गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना अपार यशासोबत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. प्रलंबित पैसे परत मिळून व्यवसायात अपेक्षित यशही मिळण्याची शक्य अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. या काळात कुटुंबातील सर्व समस्या दूर होऊ शकतात.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळू शकते. व्यवसायात अफाट यश मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं आणि पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार केल्यास भविष्यात तुम्हाला द्विगुणीत फायदा होऊ शकतो. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कन्या राशी
शुक्राचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरु शकते. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे पैसे मिळवण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. बेरोजगार आहेत त्यांना यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. वैवाहिक आणि प्रेम संबंधात गोडवा देखील दिसून येऊ शकतो.