पाच वर्षानंतर मकर राशीत एकत्र आले मंगळ आणि बुध ग्रह, या राशींवर असेल कृपा आशिर्वाद

ग्रहमंडळात ग्रहांची शत्रू आणि मित्र अशी विभागणी करण्यात आली. काही ग्रहांचं एकमेकांशी पटत, तर काही ग्रह एकमेकांकडे पाहणं पसंत करत नाही. पण काही ग्रहांच्या युतीचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे राशीचक्रात ग्रहांची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. आता पाच वर्षानंतर मकर राशीत बुध आणि मंगळ ग्रह एकत्र आले आहेत.

या दोन्ही ग्रहांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध आहेत. 5 फेब्रुवारीपासून 15 मार्चपर्यंत मंगळ ग्रह मकर राशीत असणार आहे. त्यानंतर कुंभ राशीत विराजमान होणार आहे. तर बुध ग्रह 1 फेब्रुवारीपासून 20 फेब्रुवारीपर्यंत मकर राशीत असेल. त्यानंतर कुंभ राशीत विराजमान होणार आहे. त्यामुळे आणखी 10 ते 12 दिवस मकर राशीत मंगळ आणि बुधाची युती असणार आहे. त्याचा सकारात्मक परिणाम काही राशींवर होईल. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या त्या…

मकर : लग्न स्थानातच मंगळ आणि बुधाची युती झाली आहे. त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल यात शंका नाही. या कालावधीत काही सकारात्मक परिणाम दिसून येतील. व्यवसायात चांगला फायदाही दिसून येईल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली असेल. वैवाहिक आणि कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. जोडीदाराकडून प्रगती पथावर चांगली साथ मिळेल.

 

मेष : या राशीच्या दशम स्थानात बुध आणि मंगळाची युती होत आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहांची उत्तम साथ मिळेल. करिअर आणि व्यवसायाशी निगडीत स्थान आहे. त्यामुळे व्यवसायात उत्तम प्रगती दिसून येईल. करिअरमध्ये एक उंची गाठण्यास मदत होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा या कालावधीत मिळू शकतो. तसेच नोकरीची चांगली संधी चालून येईल. फक्त पगार व्यवस्थित वाढवून मिळतो की नाही ते एकदा तपासून पाहा.

धनु : या राशीच्या धन आणि वाणीच्या स्थानात दोन ग्रह एकत्र आले आहेत. बुद्धिदाता बुध आणि पराक्रमाचा कारक मंगळ या दोन्ही ग्रहाच्या युतीचा धनु राशीला लाभ मिळेल. आर्थिक घडामोडी वेगाने घडतील. काही सौदे झटपट पूर्ण कराल. त्यामुळे हाती पैसा खेळता राहील. तब्येतीतही सुधारणा दिसून येईल. काही इच्छा पूर्ण होतील. जोडीदाराकडून गोड बातमी कानावर पडू शकते.

Leave a Comment