ज्योतिषशास्त्रात नवग्रह हा महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. या ग्रहांचा मानवी जीवनावर बरा वाईट परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. एका विशिष्ट कालावधीत ग्रह राशी परिवर्तन करत असतात. ग्रह वेळोवेळी राजयोग तयार करतात, ज्याचा प्रभाव पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर दिसून येतो. यातच मार्च २०२४ मध्ये तीन राजयोगाचा योग आहे.
यात शनिदेव कुंभ राशीत शश महापुरुष राजयोग, मंगळ आपल्या मकर राशीत रुचक राजयोग तर दुसरीकडे शुक्र मीन राशीत प्रवेश करुन मालव्य राजयोग निर्माण करत आहेत. जवळपास २०० वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती जुळून येणार आहे. या तीन राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळू शकतात. कोणत्या राशी भाग्यशाली ठरु शकतात, जाणून घेऊया…
‘या’ राशींना होणार धनलाभ?
वृषभ राशी
वृषभ राशी
तीन राजयोगांची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. यावेळी करिअरमध्ये यश मिळू शकते. पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. सुख सुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. जमीन आणि वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहू शकते.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांना तीन राजयोगांच्या निर्मितीमुळे फायदा होऊ शकतो. तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. तीन राजयोग तयार झाल्यामुळे तुम्हाला पैसा आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरी व्यवसायात घवघवीत यश तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांना या योगामुळे नशिबाची साथ मिळू शकते. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला यावेळी भरपूर नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होऊ शकतात. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांचे या काळात लग्न ठरू शकते.