षट्तिला एकादशीला राशीनुसार करा हे उपाय, उजळेल भाग्य

हिंदू धर्मात एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे. विष्णूला समर्पित या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. सर्वात पवित्र व्रतांपैकी एक व्रत म्हणून एकादशी मानली जाते.पंचांगानुसार, वर्षभरात एकूण 24 एकादशी साजऱ्या केल्या जातात. प्रत्येक एकादशी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. त्यानुसार 6 फेब्रुवारीला येणारी एकादशी ही षट्तिला एकादशी म्हणून ओळखली जाते.

षट्तिला एकादशी तिथीची सुरुवात 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 05 वाजून 24 मिनिटांनी होईल. तर एकादशीची समाप्ती 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजून 07 मिनिटांनी होईल. या दिवशी व्रतासह काही उपाय करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. या उपायाने विष्णूंचा आशीर्वाद लाभत व्यक्तीला संपत्ती, आरोग्य आणि सर्व सुख प्राप्त होते. षट्तिला एकादशीच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय केले पाहिजे जाणून घेऊया. 

 

मेष राशी

 

मेष राशीच्या लोकांनी षट्तिला एकादशीच्या दिवशी मंदिरात किंवा कोणत्याही गरजू व्यक्तीला तीळ दान करावे. या उपायाने तुमचे भाग्य उजळत जीवनात धनवृद्धी होईल.

 

वृषभ राशी

 

या एकादशीच्या दिवशी मातीच्या भांड्यात तीळ टाकूनविष्णूच्या मंदिरात दान करा, या उपायाने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल.

 

मिथुन राशी

 

षट्तिला एकादशीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले 11 लाडू दान करावेत. यासोबतच ओम नमो भगवते नारायण मंत्राचा 108 वेळा जप करावा. या उपायाने लाभ होतो.

 

कर्क राशी

 

एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून ध्यान करा. यानंतर पाण्यात तीळ मिसळून तुळशीला अर्पण करा. या उपायाने तुमची कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.

 

सिंह राशी

 

विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी या एकादशीला पूजेच्या वेळी विष्णूला तिळापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी.

कन्या राशी

 

या एकादशीच्या दिवशी घरी तिळाचे हवन करा. यासोबतच ओम नमो भगवते नारायण मंत्राचा 108 वेळा जप करा.

 

तूळ राशी

 

षट्तिला एकादशीच्या दिवशी विष्णू मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावे. या उपायाने तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते.

 

वृश्चिक राशी

 

एकादशीच्या दिवशी ओम माधवाय नमः मंत्राचा 21 वेळा जप करावा. यासोबत तिळात साखर आणि तूप मिसळून विष्णूला अर्पण करा. या उपायाने तुम्हाला विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो.

 

धनु राशी

 

विष्णूची पूजा करताना भांड्यात पाणी भरून त्यात तीळ टाकावे. हे पाणी विष्णूच्या मूर्तीसमोर ठेवा. पूजासंपल्यानंतर ते पाणी प्रसाद म्हणून स्वीकारावे. या उपायाने आरोग्याला लाभ होतो.

 

मकर राशी

 

नातेसंबंध सुधारण्यासाठी षट्तिला एकादशीच्या दिवशी पंचामृतात तीळ मिसळून विष्णूला अर्पण करावे. या उपायाने नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल.

 

कुंभ राशी

 

एकादशीच्या दिवशी तिळाचे उटणे लावून स्नान करून ध्यान करावे. विष्णूची पूजा करावी. या उपायाने व्यक्तीला चांगला जीवनसाथी मिळू शकतो.

 

मीन राशी

 

एकादशीच्या शुभ मुहूर्तावर 11 तुळशीच्या पानांवर हळदीचा तिलक लावावा आणि विष्णूच्या पूजेदरम्यान अर्पण करा. या उपायाने नोकरी किंवा व्यवसायात यश मिळू शकते.

Leave a Comment