एक वर्षानंतर सूर्य आणि बुध एकत्र येणार, या राशींची आर्थिक स्थिती सुधारणार !

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवांनी मकर राशीत प्रवेश केला आहे. या राशीत सूर्यदेव महिनाभर राहणार आहेत. 13 फेब्रुवारीपर्यंत राशीत राहणार आहे. त्यामुळे 13 दिवस मकर राशीत बुध आणि सूर्याची होईल युती होईल. त्यानंतर वर्षभरानंतर कुंभ राशीत युती होणार आहे. कारण या दोन्ही ग्रहांचा गोचर कालावधी मागेपुढे आहे. बुध ग्रह धनु राशीतून मकर राशीत 1 फेब्रुवारीला प्रवेश करणार आहे. दुपारी 2 वाजून 23 मिनिटांनी हा प्रवेश करेल. त्यानंतर 20 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 7 मार्चपर्यंत राहील. बुध हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असून या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्व आहे. तसेच या ग्रहांच्या युतीला बुधादित्य योग सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ योग आहे. या युतीचा तीन राशींच्या जातकांना जबरदस्त लाभ होणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळेल ते..

कुंभ – या राशीच्या जातकांना सूर्य आणि बुधाच्या युतीचा लाभ मिळेल. कारण काही दिवसानंतर या राशीत ग्रहांची युती होणार आहे. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नव्या लोकांशी भेटीगाठी होतील. तसेच काही लोकांसोबत असलेला वाद संपुष्टात येईल. आपण हाती घेतलेल्या कामात सकारात्मक प्रभाव दिसून येईल. विवाहासाठी स्थळ शोधणाऱ्या जातकांना अपेक्षित प्रस्ताव येऊ शकतो.

मिथुन – या राशीच्या जातकांना नशिबाची उत्तम साथ मिळेल. हाती जे काम घ्याल ते पूर्णत्वास न्याल. ग्रहांची उत्तम साथ या कालावधीत लाभेल. कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो. पण हाती घेतलेलं काम पूर्णत्वास जाईल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. कौटुंबिक स्तरावर आनंदाचं वातावरण होईल. घरातील सकारात्मक वातावरणाचा प्रभाव तुमच्यावर पडेल.

सिंह – गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. खऱ्या अर्थाने मेहनतीला यश मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ या कालावधीत लाभेल. आपल्या दु:खात मिळालेली साथ कधीच विसरता येणार नाही. पार्टनरशिपच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेला पैसा मिळेल. त्यामुळे जीव भांड्यात पडेल. आर्थिक जोखिम घेताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या.

Leave a Comment