30 दिवस ‘या’ राशींची होणार चांदी!

शुक्र पुढील महिन्यात 7 जुलै 2023 ला सकाळी 3.59 वाजता कर्क राशीतून सिंह राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर 23 जुलै 2023 सकाळी 6:01 वाजता शुक्र मागे जाईल आणि 7 जुलै 2023 ला सकाळी पुन्हा कर्क राशीत परतणार आहे. त्यानंतर शुक्र कर्क राशीत 4 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

शुक्र ग्रहाचा बदल काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. जुलै ते ऑगस्ट हा एक महिना या राशीच्या लोकांची चांदी होणार आहे.

मेष राशी

या राशीच्या लोकांसाठी शुक्राची स्थिती नातेसंबंध मजबूत करणारा ठरणार आहे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. करिअरमध्ये उत्तुंग यश मिळणार आहे.

वृषभ राशी

या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. वाहन खरेदीचा योग आहे. घरामध्ये शुभ कार्य ठरणार आहे. कार्यक्षेत्रात महिनाभर चांगला परिणाम दिसून येणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. मालमत्तेशी संबंधित गोष्टीत काळजी घ्या.

मिथुन राशी

या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचरचा महिनाभर प्रेमसंबंधासाठी रोमँटिक असणार आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मदत मिळणार आहे. प्रवासातून आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे.

कर्क राशी

शुक्र गोचरमुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. गोड बोलून तुम्ही लोकांकडून काम करुन घेणार आहात. तुमचं बँक बॅलन्स मजबूत होणार आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment