Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मया दिवशी करा हे उपाय; विवाह जुळून येतील आणि पैशांचा पडेल पाऊस!

या दिवशी करा हे उपाय; विवाह जुळून येतील आणि पैशांचा पडेल पाऊस!

मित्रांनो, आजकाल विवाह जुळवण्यामध्ये खूप सार्‍या अडचणी येत आहेत. म्हणजेच काही ना काही छोटी मोठी समस्या उद्भवते. म्हणजेच काही वेळेस मुलग्याला मुलगी पसंत पडत नाही. तर मुलगीला मुलगा पसंत पडत नाही. तसेच मुलग्याच्या नोकरी संबंधित किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या संबंधित अशा अनेक वेगवेगळ्या कारणामुळे लग्नामध्ये अडथळा निर्माण होतो आणि बऱ्याच मुला-मुलींचे विवाह जुळवण्यामध्ये खूप वेळ लागतो आणि त्यामुळे त्या मुला मुलींचे वय हे खूपच वाढते आणि मग घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या लग्नाबद्दल काळजी वाटू लागते.

तर मित्रांनो तुमचेही काही केल्याने लग्न जुळत नसेल काही ना काही अडचण ही येत असेल तसेच आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद-विवाद तसेच पैशांवरून अनेक कटकटी जर होत असतील तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्याने विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. तसेच आपले घर हे सुखा समाधानाचे राहील. तर हा उपाय नेमका कोणता आहे चला तर मग जाणून घेऊ.

तर आपल्या भाग्यातील जो गुरु आहे हा गुरु काही कारणामुळे कमजोर झाल्यामुळे आपल्याला अनेक समस्या येऊ लागतात. म्हणजेच अनेक कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात. तसेच आपल्यावर लक्ष्मी देखील नाराज होते आणि घरामध्ये पैशाची कमतरता भासू लागते. तसेच अनेक कारणामुळे मग विवाह जुळवण्यात वेळ लागतो. तर अशावेळी गुरूला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर आपणाला शास्त्रामध्ये अनेक खूप सारे उपाय सांगितले गेलेले आहेत.

हे उपाय केल्यामुळे विष्णू देवता आपल्यावर प्रसन्न होऊन आपले जीवन सुखा समाधानाचे होईल. तसेच विवाह जुळून येतील.आपल्या शास्त्रामध्ये विष्णू देव आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. तर आपणा सर्वांना माहीतच असेल की केळीच्या झाडांमध्ये भगवान विष्णू यांचा वास असतो. त्यामुळे केळीच्या झाडा संबंधित आपण हे उपाय करायचा आहे. ज्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील.

तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला दोन हळकुंड घेऊन केळीच्या झाडाजवळ जायचे आहे. सकाळी उठल्यानंतर स्नान करून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला दोन हळकुंड घेऊन केळीच्या झाडाजवळ जायचे आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ज्या काही अडचणी असतील घरामध्ये सुख समाधान नांदत नाही किंवा घरामध्ये छोट्या मोठ्या कारणांवरून भांडणे होत असतील, पैशासंबंधी टंचाई असेल अशी कोणतीही तुमची समस्या असेल ही समस्या तुम्ही त्या केळीच्या झाडाला सांगायचे आहे आणि नंतर ते जे दोन हळकुंड आहेत ते केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहेत.

अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि घरी यायचे आहे. तुम्ही हा उपाय पाच किंवा सात गुरुवार जर केला तर तुमच्या सर्व अडचणी नक्कीच दूर होतील.

जर तुम्हाला नोकरीमध्ये तुम्हाला बढती हवी असेल तर यासाठी देखील एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही बुधवारी रात्री हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे. म्हणजेच भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळ हे गुरुवारी सकाळी उठून स्वच्छ स्नान करून ती डाळ आणि गुळ हातामध्ये घ्यायचे आहे. आणि जी आपली समस्या आहे ती केळीच्या झाडाला सांगायची आहे. हरभरा डाळ आणि गुळ ते केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे. यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये नक्कीच बढती मिळेल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

तर हा देखील उपाय तुम्हाला पाच किंवा सात गुरुवार करायचा आहे. पाच गुरुवार होण्याअगोदरच तुम्हाला याचा फरक नक्कीच दिसून येईल. तसेच जर पती-पत्नीमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असतील किंवा विवाह जुळवण्यामध्ये तुम्हाला खूप सारे अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही यासाठी हळकुंडाचा उपाय करायचा आहे.

यामुळे पती-पत्नी मधील वाद तसेच विवाह लवकर जुळून येईल. तर तुम्हाला हळकुंड घेऊन गुरुवारी सकाळी केळीच्या झाडाजवळ जायचे आहे. तिथे गेल्यानंतर आपली समस्या सांगायची आहे. म्हणजे विवाहामध्ये अडथळे तसेच पती-पत्नीमध्ये भांडणे या अडचणी आपण सांगायचे आहे. सांगून झाल्यानंतर ते हळकुंड तुम्ही ते केळीच्या झाडाच्या बुडाशी अर्पण करायचे आहेत. यामुळे तुमचे विवाह लवकर जुळून येतील आणि जे काही पती-पत्नीमध्ये वाद विवाद होतात ते देखील नक्कीच कमी होतील.

तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमचे विवाह जुळण्यामध्ये खूप सारे अडथळे येत असतील तसेच घरांमध्ये अशांती असेल, नोकरीमध्ये म्हणावे तितके यश प्राप्त होत नाही तर वरील सांगितलेले हे उपाय तुम्ही अवश्य करून पहा. याचा फरक तुम्हाला काही दिवसातच दिसून येईल.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन