नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या गोष्टी आणा घरी, लाभेल सुख समृद्धी

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आणा. या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्राची पूजा विधीपूर्वक करा. असे मानले जाते की घरात त्रिशूल ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते. तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो.

2024 वर्षाचा पहिला दिवस (New Year 2024) सोमवार आहे. त्यामुळे 1 जानेवारीला शंकराची विशेष पूजा केली जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच शिवमंदिरे सजवली जात आहेत. तुम्हालाही सुख, सौभाग्य आणि संपत्तीत वृद्धी हवी असेल, तर नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्नान आणि ध्यान करून विधीनुसार भगवान शंकराची पूजा करा. तसेच, भगवान शिवाशी संबंधित या 3 गोष्टी नक्कीच घरी आणा. यामुळे तुमच्या जीवनातील लकारात्मकता दूर होईल आणि संपूर्ण वर्ष एका सकारात्म उर्जेचा अनुभव कराल.

डमरू
जर तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी डमरू नक्कीच घरी आणा. यानंतर विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. पूजेनंतर घराच्या सर्व भागात डमरू वाजवा. हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो. त्यानंतर हा डमरू तुमच्या स्वयंपाक घरात ठेवा व दर सोमवारी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात तो वाजवा त्यामुळे घरात सकारात्म उर्जा प्रवाहित राहिल.

पारद शिवलींग
जर तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पारद शिवलिंग अवश्य घरी आणा आणि पारद शिवलिंगाची यथासांग पूजा करा. घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना केल्याने जीवनातील सर्व दु:ख नष्ट होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. पारद शिवलिंग हा सकारात्क उर्जा प्रवाहित करतो.

त्रिशूळ
आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आणा. या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्राची पूजा विधीपूर्वक करा. असे मानले जाते की घरात त्रिशूल ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते. तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. त्रिशूश हे शक्तीचे प्रतिक आहे. जे लोकं अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करत असतील त्यांनी आपल्या घरी अवश्य त्रिशूळ आणावा.

रूद्राक्षाची माळ
रूद्राक्षाची उत्पत्ती ही भगवान शंकराच्या अश्रूमधून झाली अशी धार्मिक मान्यता आहे. रूद्राक्ष हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. नवीन वर्षाच्या वहिल्या दिवशी रूद्राक्षाची माळ घरी आणावी. त्यामाळेने ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभेल.

Leave a Comment