अनेक वर्षांनंतर ऐश्वर्याचं नाव घेताच फुलला सलमान खानचा चेहरा!

सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा व्हायरल होणार व्हिडीओ २०१८ मधील आहे. जेव्हा सलमान खान ‘लव्हयात्री’ सिनेमाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित होता. तेव्हा एक महिला पत्रकार म्हणाली, ‘माझं नाव ऐश्वर्या आहे…’ तेव्हा ऐश्वर्याचं नाव ऐकताच सलमानचा चेहरा फुलला आणि हसला… पुढे महिला पत्रकार भाईजानला म्हणते, ‘माझ्याकडे पाहा आधी…’ पण सलमान खान नजर चुकवत म्हणतो..

‘हा… बोला..’ सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

१९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केल्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम फुललं. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट देखील केलं. शिवाय तेव्हा अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याला चाहत्यांनी फक्त ऑनस्क्रिन नाही तर, ऑफस्क्रिन देखील प्रचंड प्रेम दिलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

विभक्त झाल्यानंतर ऐश्वर्याने सलमान खानवर आरोप करत ब्रेकअपचं कारण सांगितलं. ऐश्वर्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितलं की, स्वतःला संकटापासून दूर केलं आहे, कारण २००१ मध्ये सलमान खान मध्यरात्री अभिनेत्रीच्या घरी आला आणि वाद करण्यास सुरुवात केली. तेव्हा ऐश्वर्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार देखील केली. एवढंच नाही तर, अभिनेत्री घराबाहेर येत नसल्यामुळे सलमानने स्वतःला संपवण्याची देखील धमकी दिली.

आता ऐश्वर्या अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एक मुलगी देखील आहे. बच्चन कुटुंबाच्या नातीचं नाव आराध्या असं आहे. आराध्या देखील प्रसिद्ध सेलिब्रिटी किड आहे. तिचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय आराध्याला अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यासोबत स्पॉट केलं जातं.

Leave a Comment