26 डिसेंबर : श्री दत्त जयंती,स्वामींसमोर संकल्प करून हातात बांधा लाल दोरा, स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील !

 

 

मित्रांनो येत्या 26 तारखेला म्हणजेच 26 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे या दिवशी स्वामी समर्थांच्या समोर संकल्प करून हातात असा लाल दोरा बांधायचा आहे. हा उपाय केल्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावर कायम राहील, तसेच स्वामी समर्थ तुमचे रक्षण करतील. 26 डिसेंबर रोजी दत्तजयंती असल्यामुळे हा दिवस स्वामी समर्थांच्या सेवेकरी यांसाठी व भक्तांसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे.

 

दत्तजयंतीच्या दिवशी स्वामी समर्थांचे अनेक भक्त दिवसभर स्वामी समर्थांचे भजन करत असतात तसेच त्यांचे सेवेकरी त्यादिवशी पूर्ण दिवस स्वामी समर्थांच्या पारायणात मग्न असतात.

या दिवशी अनेक लोक मनोभावे स्वामी समर्थांची पूजन करतात, तर अनेक लोक स्वामी समर्थांचां आशीर्वाद मिळविण्यासाठी अनेक उपाय करत असतात. शास्त्रामध्ये ही स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत.

 

स्वामी समर्थांच्या नावाचा जप करणे, स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन त्यांच्या पारायणाचे स्मरण करणे, स्वामी समर्थांच्या मूर्तीला अभिषेक करणे असे अनेक उपाय आपल्याला सांगितले जातात.पण त्यापेक्षाही प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

 

दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ स्नान करून, स्वामी समर्थांच्या प्रतिमे समोर किंवा मूर्ती समोर, किंवा आपल्या देवघरात बसून, सर्वप्रथम तुम्हाला लाल रंगाचा दोरा आणायचा आहे हा दोरा शक्यतो पूजेच्या वापराचा असावा.

हा दोर आपल्याला पूजेच्या दुकानात सहज उपलब्ध होईल.हा दोरा शक्यतो लाल रंगाचा असावा जर लाल रंगाचा दोरा मिळाला नाही तर इतर कोणत्याही रंगाचा चालेल.

 

सर्वप्रथम,दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून, हा दोरा स्वामी समर्थांच्या प्रतिमे किंवा मूर्तीसमोर ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन, तुमची जी इच्छा आहे किंवा जी अडचण आहे आहे ती स्वामी समर्थांच्या समोर मांडायचे आहे,हातात पाणी घेऊन स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज आमच्यावरील सर्व संकटे दूर करा, आमच्या सर्व इच्छा पूर्ण करा व तुमची कृपा आमच्यावर सदैव असू द्या.

 

ही प्रार्थना म्हणून झाल्यावर ते पाणी एका ताटलीमध्ये सोडायचे आहे आणि तुम्ही जो दोरा आणला होता त्याला अष्टगंध आणि तांदूळ,फुले वाहून पूजन करायचे आहे. आणि पूजन झाल्यानंतर हा दोरा आपल्या उजव्या हातात बांधायचा आहे, जर तुम्ही पुरुष असाल तर दोरा उजव्या हातात व स्त्री असाल तर डाव्या हातात बांधायचा आहे.

 

हा दोरा शक्यतो घरातील करत्या व्यक्तीने हातात बांधायचा आहे.आणि त्या ताटलीतील पाणी तुळशी मध्ये अर्पण करायचे आहे.हा दोरा पुढील दत्त जयंती पर्यंत तसाच हातात बांधून ठेवायचा आहे, त्यानंतर पुढच्या वर्षीच्या दत्त जयंतीला हा दोरा काढून तुळशीत अर्पण करायचा आहे किंवा शक्य असल्यास वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे. आणि नवीन दोरा बांधू शकता.मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा.

Leave a Comment