26 डिसेंबर दत्त जयंती : सकाळी उठताच बोला ‘हे’ 2 शब्द : घरातील धनसंपत्तीत भरभराट होईल !

 

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

 

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की 26 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे या दिवशी गुरुदेव दत्तांचा जन्मोत्सव अगदी उत्साहात पार पाडला जातो, त्यामुळे दत्त आणि स्वामी समर्थांचे अनेक भक्त आणि सेवेकरी आपल्या स्वामींची सेवा करण्यात मग्न असतात. तर काही सेवेकरी स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये जाऊन पारायणाचे पठण देखील करताना आपल्याला दिसतात. तसेच आणि भक्त स्वामींना प्रसन्न करण्यात यासाठी वेगवेगळे उपाय करतात. कारण या दिवशी दत्तांचे नामस्मरण किंवा सेवा केल्यास त्या व्यक्तीला दत्ततत्त्वाचा अधिक लाभ मिळतो.

 

आणि ठिकाणी दत्तजयंती च्या आधी आठ दिवस किंवा नंतर आठ दिवस गुरु चरित्राच पारायण केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हटले जाते.या दिवसांमध्ये गुरु दत्ताचे,नामस्मरण,भजन कीर्तन केले जाते आणि दत्त जयंतीला हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न केला जातो. दत्त जयंती च्या दिवशी श्री दत्तांच्या नामाचे स्मरण केल्यामुळे किंवा त्यांचा मंत्र जप केल्याने त्या व्यक्तीला बल,बुद्धी आणि विवेकाची प्राप्ती होते. त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशी श्री दत्तांना प्रसन्न करण्यासाठी कोणते दोन शब्द म्हणायचे आहे ते आपण आता जाणून घेऊया.

 

सर्वप्रथम दत्तजयंतीच्या दिवशी आपण लवकर उठून स्वच्छ स्नान करायचे आहे आणि जशी आपण आपल्या देवघरातील जी पूजा करतो ती पूजा करून झाल्यानंतर श्री दत्तांची विशेष पूजा आपल्याला त्या दिवशी करायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी पूजा करून झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून गुरुचरित्राच्या किमान एका अध्यायाचे पठण करायचे आहे आणि जर गुरुचरित्राच्या एका अध्यायाचे पठण करणे शक्य नसेल तर आम्ही जे दोन शब्द सांगणार आहोत त्याचे नामस्मरण तुम्ही त्यादिवशी करू शकता.

 

हे दोन शब्द म्हणजे हा श्री गुरु गुरुदेव दत्तांचा मंत्र आहे. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त! किमान दोन वेळा या मंत्राचे तुम्हाला नामस्मरण करायचे आहे. या मंत्राचे नामस्मरण करताना तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरू शकता आणि जर तुमच्याकडे कोणती माळ नसेल तर कोणतीही माळ वापरता शांत डोळे मिटून तुम्ही या मंत्राचा जप दत्तजयंतीच्या दिवशी करू शकता. पण या मंत्राचे नामस्मरण तुम्हाला पूर्ण श्रद्धेने व मनापासून करायचे आहे.

 

तर मित्रांनो दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही या मंत्राचे नामस्मरण करा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. श्री दत्त गुरु तुमच्या मनातील सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण करतील.

 

मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.

Leave a Comment