राशिभविष्य : बुधवार दि. 6 डिसेंबर 2023

  1. राशिभविष्य : बुधवार दि. 6 डिसेंबर 2023

बुधवार, ६ डिसेंम्बर २०२३. कार्तिक कृष्ण नवमी. शरद ऋतू.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे”
नक्षत्र – उत्तरा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह/कन्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे. अचानक धनालभाचे योग आहेत. आनंदात राहाल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पूर्वार्धात जमीन व्यवहारातून लाभ होतील. प्रगती कराल. आर्थिक नियोजन करा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सकाळच्या सत्रात उत्तम लाभ होतील. आर्थिक चणचण दूर होईल. येणी वसूल होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कुटुंबासह धार्मिक कार्यात मग्न व्हाल. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आत्मविश्वास वाढेल. लक्ष्मी प्रसन्न होईल. मनासारखी कामे होतील. दानधर्म कराल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. दानधर्म करण्यास अत्यंत अनुकूल कालावधी आहे. खर्चात वाढ होईल. व्यसने टाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अति उत्तम पूर्वार्ध आहे. जोडीदाराकडून उत्तम लाभ होतील. पत्नी खुश राहील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अर्थप्राप्ती होण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. शेअर्स मध्ये मात्र नुकसान संभवते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) शेअर्स किंवा लॉटरीमधून लाभ होतील. अंदाज अचूक येतील. घरगुती वाद टाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. पूर्वार्धात अनपेक्षित घटना घडतील. जेष्ठ व्यक्तींची चिंता लागून राहील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) जुनी येणी वसूल होतील. कर्जे मंजूर होतील. प्रेमात यश मिळेल. उत्तरार्ध चिंता वाढवणारा आहे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पूर्वध अनुकूल आहे. आर्थिक सुबत्ता आणणारा दिवस आहे. मात्र भागीदारी व्यवसायात कटुता येऊ शकते.

 

Leave a Comment