नोव्हेंबरचा शेवट ‘या’ राशींना असणार शुभ! लॉटरी, शेअर बाजारातून फायदा; धनलाभ योग

नोव्हेंबर महिन्याची सांगता होत असताना, बुध, राहू, केतू आणि शुक्र यांचे राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी गुरु आणि हर्षल मेषेत, केतु, शुक्र कन्येत असून, २९ रोजी शुक्र तूळ राशीत जाईल. रवि, मंगळ आणि बुध वृश्चिक राशीत असून, २६ रोजी बुध धनु राशीत जाईल. प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहे.

 

चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीतून राहील. त्रिपुरारी पौर्णिमा व कार्तिक स्वामी दर्शन योग, ३० नोव्हेंबर रोजी संकष्ट चतुर्थी आहे. दिवाळी, कार्तिकी एकादशी, चातुर्मास समाप्ती यांसह अनेकार्थाने नोव्हेंबर महिना विशेष ठरला. आता यानंतर इंग्रजी वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना सुरू होईल.

 

मेष: वैवाहिक जीवनात व्यक्तिगत सामंजस्य वाढेल. संततीसाठी काळ उन्नतीदायक आहे. संबंधात सुधारणा होईल. प्रेमिकेशी असलेला दुरावा कमी होईल. आर्थिक स्थिती चांगली असेल. जलदगतीने विचार कराल. एखादे नवीन काम करण्याचा प्रयत्न कराल. प्राप्तीत वृद्धी होईल. खर्च झाला तरी आपणास तो जाणवणार नाही. नोकरी करणाऱ्यांसाठी कालावधी चांगला असला तरी वायफळ गोष्टींपासून दूर राहावे. स्थिती बिघडेल किंवा मानहानी होईल असे कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करू नका.

 

मिथुन: वैवाहिक जीवन उत्तम राहील. नोव्हेंबरची सांगता खर्चिक असू शकेल. प्राप्तीतील कमतरता जाणवू शकेल. सतर्क राहा. विरोधकांपासून सावध राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. नशिबाची साथ मिळाल्याने यश प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी थोडा तणाव राहील. व्यापारात खर्च वाढण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दूर जावे लागू शकते. घरापासून दूर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतील.

 

तूळ: विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगू शकतील. एखादा मोठा फायदा होऊ शकतो. मग तो व्यापारातून असेल किंवा वैवाहिक जोडीदारामुळे असेल. ह्या संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकाल. प्राप्तीत वाढ होईल. खर्च तर होतीलच. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. प्रयत्न यशस्वी होतील. स्थान बळकट होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.

 

कुंभ: एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. मित्रांसह मौजमजा करण्याची संधी मिळाल्याने मन आनंदून जाईल. नोकरी करणाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होईल. कामाचे समाधान मिळेल. व्यापाऱ्यांना काही नवीन योजनांसह काम करण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा होत असल्याचे दिसेल. परिश्रम यशस्वी होतील. आरोग्याची एखादी किरकोळ समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

 

मीन: काळ खूपच चांगला आहे. स्वतःवर लक्ष देऊन जबाबदाऱ्या ओळखाल. व्यवहारात झालेल्या बदलामुळे आपणास आनंद व आश्चर्य वाटेल. वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्यास तयार व्हाल व त्याचे सकारात्मक परिणाम मिळताना दिसून येईल. एखाद्या सोहळ्यात सहभागी व्हाल.

नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कालावधी त्रासदायी असू शकतो. कामातून योग्य लाभ होत नसल्याचे जाणवल्याने काहीसे उदास होतील. अशा स्थितीत शांत राहून व धीराने काम करणे हितावह ठरेल. प्राप्ती चांगली असेल. व्यापाऱ्यांना कामातून लाभ होईल.

Leave a Comment