वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रहाला व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा हा राजकुमार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, २७ नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे. २८ डिसेंबरपर्यंत बुधदेव विराजमान असतील, त्यामुळे ‘महाधन योग’ तयार होत आहे. हा एक अतिशय शुभ आणि लाभदायक योग मानला जातो, त्यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता निर्माण होत आहे. पाहा कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
मेष राशी
मेष राशींच्या लोकांसाठी महाधन योग खूप फायदेशीर ठरु शकतो. या काळात आर्थिक स्थिती सुधारुन भौतिक सुखसोयी वाढण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये यश मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महाधन योग वरदानासारखा असेल. तुम्हाला पैसे मिळू शकतात. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होऊ शकतात. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना मेहनतीचं पूर्ण फळ मिळून धनलाभ होण्याची शक्यता आहे. भरपूर पैसे मिळू शकतात. व्यवसायात आणि नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतं. या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदी करु शकता. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.