मित्रानो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सणांच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा ग्रहांची स्थिती आणखी लाभदायी होते तेव्हा प्रभावित राशींच्या नशिबाला कलाटणी मिळण्याची शक्यता असते. यंदाची दिवाळी ही अशाच राजयोगाने खास होणार आहे. अत्यंत दुर्मिळ असे पाच शुभ राजयोग हे ७०० वर्षांची दिवाळीच्या मुहूर्तावर तयार होत आहेत.
गजकेसरी, हर्ष, उभयचरी, काहल व दुर्धरा या राजयोगांनी यंदाची दिवाळी खरोखरच उजळून निघणार आहे. त्यातही चार अशा राशी आहेत ज्यांच्यासाठी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनचा कालावधी अत्यंत भरभराटीचा ठरणार आहे. या राशी कोणत्या व धनलक्ष्मी माता त्यांना नेमका कसा लाभ करून देऊ शकते याविषयी ज्योतिषीय अंदाज पाहूया..
मेष रास
पाचही राजयोग मेष राशीसाठी सुखाचा सुवर्ण काळ घेऊन येणार आहेत. येत्या काही दिवसात तुमच्या आर्थिक मिळकतीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना समोरून रोजगाराच्या संधी चालून येऊ शकतात. वैवाहिक संबंध सुधारण्यासाठी हा कालावधी लाभदायक ठरेल. वादविवाद टाळण्यासाठी वाणीवर थोडे नियंत्रण ठेवावे. या कालावधीत तुम्हाला तुमच्याच जुन्या काही निर्णयांचा लाभ होताना दिसेल. गुंतवणुकीवर भर द्या.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी पाच महायोग फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण शनिदेव तुमच्या राशीतून नवव्या स्थानी गोचर करत आहेत. त्यामुळे या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. त्याच वेळी, तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढण्यासह मित्रांबरोबरचे संबंध अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायासंदर्भात प्रवास घडू शकतो, जो तुमच्यासाठी शुभ ठरु शकतो.
मकर रास
मकर राशीसाठी ५ महायोग बनणे अनुकूल ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून धनाच्या स्थानी भ्रमण करत आहेत. तर गुरु तृतीय स्थानी सक्रिय आहेत. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळवू शकता. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच तुम्हाला बहिण-भावाचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. तसेच अविवाहितांचे लग्न ठरण्याचीही शक्यता आहे.
कन्या रास
कन्या राशीच्या मंडळींना पाचही राजयोग घडल्याने भौतिक सुख सुविधा प्राप्त करण्याची क्षमता वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी नांदू शकते. नोकरीशी संबंधित नवीन प्रस्ताव मिळू शकतात. नोकरी-व्यवसायात प्रगती होऊ शकते. कामात यश मिळू शकतो. या काळात कन्या राशीच्या मंडळींना वाडवडिलांच्या रूपात पैसे प्राप्त होऊ शकतात आर्थिक मजबूत होण्याची शक्यता आहे.