स्वामीं महाराजांसमोर डोळे भरुन आल्याने काय घडते? स्वामी कोणता चमत्कार करतात?

मित्रांनो स्वामीं महाराजांसमोर रडल्यामुळे काय होत असेल? आता तुम्हाला या चमत्काराविषयी माहिती नसेल. परंतु मित्रांनो पूजा करताना तुमच्या डोळ्यात पाणी का येत असावं.? किंवा तुमचेही स्वामींसमोर डोळे भरुन येतात का.? जर याच उत्तर हो असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. बस शेवट पर्यंत लक्ष देऊन वाचायला हवी.

मित्रानो आज आम्ही तुम्हाला असे काही रहस्य सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल कि कोणत्या अज्ञात दैवी शक्ती आहेत. ज्यांची कृपा तुमच्यावर सदैव आहे. मित्रानो आपल्या प्राचीन ग्रंथानुसार सुरवातीला हे ब्रम्हांड एकदम रिकामं होत.

सगळीकडे जणू अंधकार होता. त्यांनंतर अचानक एक विशालकाय शिवलिंग प्रकट झाले ज्यामुळे हे संपूर्ण ब्रह्मांड ऊर्जेने भरून गेले. त्यानंतर काही कालावधी नंतर या ब्रह्मांडात पदार्थांची निर्मिती झाली. ज्यात पाणी, धातू, वायू, अग्नी या सारख्या किती तरी गोष्टींची निर्मिती झाली.

म्हणून अशी मान्यता आहे कि या सर्वांमध्ये शिव शंकराचा निवास आहे. सगळ्या ब्रह्मांडात असलेली मुबलक ऊर्जा शिवच आहेत. शिवच आदी आहेत, शिवच अंत आहेत. जेव्हा तुम्ही ईश्वराचे ध्यान करायला बसता तेव्हा तुमचा आत्मा ईश्वराची जोडला जातो.

ईश्वर सर्वव्यापी आहेत. सजीव असो किंवा निर्जीव सर्वच ठिकाणी ईश्वराचा वास आहे. म्हणूनच तुमच्या आत्म्याचा ईश्वराची संबंध जोडला जातो. तेव्हा ईश्वर म्हणजेच देव तुम्हाला काही संकेत देतात. ते संकेत एकदम साधारण स्वरूपाचे असतात.

असे साधे साधे संकेत असतात ज्याकडे आपले दुर्लक्ष होते. सर्वव्यापी परमात्मा सर्व जीव जंतूशी जोडला गेलेला आहे. जेव्हा पण आपण पूजा किंवा ध्यान करतो तेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाते व त्यामुळे आपले मन प्रसन्न होते.

दुःखाचे वातावरण पण आनंदामध्ये भरून जाते. तुम्ही कितीही तणावात असाल तरी तुम्हाला ताजेतवाने वाटायला लागते. कारण या सकारात्मक शक्तींचा प्रभावच असा असतो कि किती तरी वेळेला विद्यार्थी अभ्यासाला बसताना माता सरस्वतीचे स्मरण करत त्यांच्या डोळ्यांत पाणी येते.

याचा अर्थ असा आहे कि माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावर झालेली आहे. तसेच आपण देवांशी निगडित काही कथा ऐकत असतो तेव्हा आपल्या शरीरावर काटा उभा राहतो सोबतच डोळ्यांत कित्येकदा पाणी येते.

मित्रानो जर तुम्ही ध्यान मग्न होऊन जर स्वामींची प्रार्थना करत असाल किंवा अन्य देवी देवतांची प्रार्थना करत असाल आणि त्यावेळी जर डोळ्यांत पाणी आले तर हा ईश्वराचा संकेत आहे. त्यावेळी आपली मनोकामना नक्की देवाला पुढे मांडा.

ज्योत अचानक मोठी होत असेल तर अशी मान्यता आहे कि त्यात भगवान शिव शंकरांचा वास आहे. पूजा करताना ज्योत मोठी झाली तर ईश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे असं समजावं.

मित्रानो पूजा करताना आपण धूप दीप लावतो. जर धूप लावलेला धूर देवाकडे जात असेल तर याचा अर्थ असा होतो कि तुमची सेवा, प्रार्थना ईश्वराने कबूल केलेली आहे. पूजा करताना वाहिलेले फुल पडले तर ते शुभ मानले जाते.

सकाळच्या वेळी जर दारावर गाय आली तर गाईला खाऊ घाला. पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने हात जोडून गोमातेसमोर इच्छा मागा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल.

Leave a Comment