स्वामींची सेवा कश्या पद्धतीने करावी? या सेवेत आल्यावर आपल्याला कोणकोणते अनुभव येतील

मित्रानो, बरेचजण स्वामीच्या सेवेत आल्यावर कोणते लाभ आपल्या ला होतात का? हा प्रश्न सर्वजण विचारत असतात. मग ते नवीन सेवेकरी असू द्या किंवा जुने सेवेकरी हा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यांना असे वाटते की स्वामींची सेवा करून आपल्याला कोण कोणते लाभ मिळतील किंवा स्वामींची सेवा का करावी चमत्कार केव्हा होतात अनुभव केव्हा येतो आणि फळं केव्हा मिळते मनातील इच्छा केव्हा पूर्ण होतात? सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला या लेखातून देणार आहे.

मित्रांनो, स्वामींची सेवा केल्याने स्वामींच्या सेवेत आल्याने एक प्रकारचे समाधान मिळते. त्या सोबतच सुरक्षा कवच देखील आपल्याला मिळते. समाधान सेवा करण्याचे नाही तर जीवनात आनंदी असल्याचे समाधान आपल्याला मिळते. आपल्या जवळ सर्व काही आहे असे वाटते त्याला समाधान म्हणतात.

आणि सुरक्षा कवच ते स्वामींनी आपल्या ला दिलेले असते. स्वामी आपल्या सतत सोबत असतात. स्वामींच्या सेवेत आल्याने माणूस आनंदी राहू लागतो. माणूस प्रसन्न समाधानी आणि आनंदी राहतो. त्याला रोज नवनवीन अनुभव मिळत असतात हे अनुभव चमत्कारिक असू शकतात किंवा कोणती तरी नवनवीन कामे मिळत असतात. बनत असतात हेच अनुभव रोज वेगवेगळ्या प्रकारे त्याला मिळत असतात.

सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या अनुभवास येत असल्यामुळे आपल्याला असे वाटते की आपले नशीब चांगले झाले आहे. आपले नशीब उजळले आहे. नशीब आपल्याला आपली साथ देत आहे. त्याचबरोबर आपली परिस्थिती देखील सुधारू लागते. कितीही वाईट परिस्थिती असली तरी ती सुधारू लागते.

हे सर्व आपण स्वामीच्या सेवेमध्ये गेल्यामुळे घडत असते. त्याचबरोबर मित्रांना आपले आरोग्य देखील चांगले राहते. तुम्हाला कोणताही वाईट परिणाम किंवा दुष्परिणाम भोगावा लागत नाही हे सर्व लाभ आपलेला स्वामीच्या सेवेत आल्यावर स्वामीची सेवा केल्यामुळे मिळत असतात.

परंतु जर तुम्ही स्वामीची सेवा करत असाल स्वामीच्या सेवेत आहेत परंतु यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या मध्ये घडली नसेल. तर मित्रांनो, तुम्ही खचून जाऊ नका. तुम्ही धीर सोडू नका तुमची सेवा तुम्ही सोडू नका. स्वामी सर्वांना सर्व काही देत असतात. फक्त योग्य वेळ यावी लागते.

आपली परीक्षा घेत असतात. त्या परीक्षेत आपण पास व्हावे लागते. पास झाल्यावर स्वामी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सर्व काही मिळू शकते. विश्वास आणि मनोभावाने आणि श्रद्धेने स्वामींची सेवा करा, त्याचे फळ स्वामी तुम्हाला.नक्कीच देतील.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असते या माहिती तून तुम्हाला नक्कीच समजले असेल की आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो भक्ति करतो कि मनापासून कोणतीही स्वामीसाठी जी गोष्ट करतो त्याचा लाभ किंवा त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल.

फक्त जी काही तुम्ही गोष्ट करणार जी काही सेवा करणार ती अगदी मना पासून करा आणि अगदी प्रेमाने करा.तुम्हाला नक्की स्वामी पावतील.

Leave a Comment