स्वामी समर्थ सांगतात दिवसाची सुरुवात अशी करावी सुख समृद्धी नांदेल!

मित्रानो, आपल्यापैकी बरेच हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. स्वामी हे आपल्या प्रत्येक संकटांमध्ये आपली साथ देत असतात. तसेच अनेक अडचणींच्या काळामध्ये योग्य तो मार्ग देखील दाखवतात. तर स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की जर तुम्ही दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने केली तर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आहे. म्हणजेच मित्रांनो अनेक वेळा आपणाला खूप साऱ्या अडचणी संकटे ही येत राहतात. परंतु आपण ज्या पद्धतीने दिवसाची सुरुवात करू त्या पद्धतीने आपणाला त्याचे फळ मिळत असते.

त्यामुळे दिवसाची सुरुवात स्वामिनी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही केला तर यामुळे तुमचे आयुष्य बदलणार आहे. चला तर मग जाणून घेऊया स्वामींच्या मते दिवसाची सुरुवात कशी करावी ते.

सकाळी लवकर उठणे. उठल्यानंतर लगेच अंथरुणातून ताटकन उडी मारून उठू नये.उठल्या जागी अंथरुणात तसेच बसून पाच मिनिटं आपल्या इष्टदेवतेचे डोळे बंद मिळून स्मरण करावे आणि विनंती करावी की माझा आजचा दिवस अगदी छान जाऊ दे.

उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्यावे व नंतर आपला प्रात:विधी उरकून एक तास शरीरासाठी काढून व्यायाम करावा.
आठ ते नऊच्या दरम्यान मोड आलेली कडधान्य नाष्टा म्हणून सेवन करावी. सर्व काही आटपून अंघोळ आणि देवपूजा करून घ्यावी.

त्यानंतर जे काही काम असेल ते दिवसभर करावे. दुपारी जेवणात एक वाटी दही असावी. दुपारचं जेवण एक ते दोनच्या दरम्यान असावे. संध्याकाळी दूर कुठेतरी एखाद्या रम्य ठिकाणी बसावे किंवा फिरून यावे.

संध्याकाळचे जेवण सात वाजता करून नंतर शतपावली करावी.मोबाईल बघावा व महत्त्वाचे कॉल करावे. दिवसभराच्या अन्य वेळेत मोबाईल कमीत कमी वापरला तर उत्तम.

झोपण्याच्या एक तास आधी घरच्या सर्व सदस्यांना वेळ द्यावा आणि त्यांच्या सोबत चर्चा करावी आणि नंतर झोपावे.
सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळावे. आणि आवश्यक असेल तरच मोबाईल बघावा. शक्यतो झोपेतून उठल्या उठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाणे टाळा.

Leave a Comment