कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण असा योग 9 वर्षानंतर जुळून आला आहे. यापूर्वी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रह 8 ऑक्टोबर 2014 रोजी जुळून आलं होतं. हे चंद्रग्रहण भारतातून दिसलं होतं. अशीच स्थिती आता जुळून आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांचं महत्त्व वाढलं आहे. चंद्रग्रहण मेष राशीत होत आहे. मेष राशीत गुरु आणि राहुची युती आहे. त्यामुळे चांडाळ योग आहे. मात्र चंद्र आणि गुरुची युती होत असल्याने गजकेसरी योगही जुळून येणार आह. दुसरीकडे, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी चंद्राची शीतलता आणि अमृतवर्षाव होतो असं सांगितलं जातं. तसेच कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. ही संपूर्ण स्थिती पाहता राशीचक्रावर शुभ अशुभ परिणाम होईल. तीन राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळणार आहे.
तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
मिथुन : या राशीच्या जातकांना ग्रहांची स्थिती लाभदायक ठरेल. देवी लक्ष्मीची कृपा मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. पण या कालावधीत वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. समाजात मानसन्मान वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवावा लागेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. उद्योगधंद्यात तुम्ही प्रगतीची नवी शिखरं गाठाल. तसेच उत्पन्नात वाढ होईल.
कर्क : या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती या काळात चांगली राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगला लाभ मिळेल. बॉसकडून कौतुकाची थाप पडेल. नव्या नोकरीची संधी मिळू शकते. पगार आणि इतर बाबी पटल्या तरच उडी मारण्याचा निर्णय घ्या. संपत्ती किंवा वाहन खरेदीचा योग जुळून येईल. कायदेशीर प्रकरणात यश मिळू शकतं.
मकर : उद्योगव्यवसायात तुम्हाला प्रगती दिसून येईल. कौटुंबिक स्तरावर गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. देवदर्शनाला जाण्याचा योग आहे. कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्या. कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग जुळून येईल. आर्थिक स्थिती खराब असल्यास जोडीदारासोबत शेअर करा. कदाचित मार्ग सापडू शकतो.