मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वामींनी सांगितलेली वाणी सांगणार आहोत. त्यानुसार जर तुम्ही आचारण केले तर तुम्ही नक्कीच आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात.
मित्रांनो, सर्वसाधारण धर्म हाच आहे की मन, वाणी, आणि शरीराने कोणाचेही हिंसा न करणे, सत्यावर आढळ राहणे चोरी न करणे काम, क्रोध, लोभापासून दूर राहणे आणि प्राणीमात्रांचे कल्याण होईल तेच करणे स्नान भोजन हवन जप आणि मलमूत्र त्याग करतेवेळी मौन पाळावे. दुसऱ्याच्या स्वभावाची किंवा कामाची प्रशंसा किंवा निंदा करू नये. जी व्यक्ती दुसऱ्याच्या स्वभावाची किंवा कर्माची निंदा किंवा स्तुती करते ती द्वैत्य दृष्टीमुळे परमार्थ मार्गापासून तात्काळ भ्रष्ट होत असते.
मित्रांनो, जे भक्त प्रेमाने जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना लहानशी वस्तू सुद्धा अर्पण करतात तेव्हा ती स्वामी महाराजांना फार मोठी वाटते परंतु श्रद्धेने त्यांना पुष्कळ काही दिले तरी त्यामुळे श्री स्वामी महाराज संतोष होत नाहीत जो कोणी सेवेकरी फक्त भक्तीने पान फुल किंवा पाणी श्री स्वामी महाराजांना अर्पण करतो त्या शुद्धचित्त भक्ताने भक्तीने दिलेले सारे काही ते स्वीकारतात.
मित्रांनो, स्वामी म्हणतात हे शरीर तुच्छ विषय भोग भोगण्यासाठी नसून जन्मभर सेवा साधना करून शेवटी अनंत आनंद स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी आहे. गुण आणि दोष पाहत राहणे हा सर्वात मोठा दोष आहे आणि गुण दोषांकडे दृष्टी न देणे हा सर्वात मोठा गुण आहे.
माणसांच्या हृदयाला जेवढा त्रास दृष्टांच्या मर्मवेदी कठोर वागन्याने होतो तेवढा मर्मा बेदी बाणांनी होत नाही. यशस्वी लोकांचे शुद्ध यश आणि कुणी लोकांचे प्रशासनीय गुण थोडासा सुद्धा लोभ नष्ट करत असतो. जो मनावर नियंत्रण मिळवतो तो देवांचाही देव होतो श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये कृप केलेल्या बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेवणे हे योग साधनेचे सार आहे.
जो निरपेक्ष भावाने परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो त्याला महाराजांचा सेवयोग प्राप्त होतो आणि त्या निष्काम सेवा योगानेच तो श्री स्वामी समर्थ महाराजांना ही प्राप्त करून घेत असतो.