विजयादशमीच्या दिवशी ‘या’ एका झाडाची पूजा करा होईल चमत्कार!

मित्रानो, जर तुम्हाला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल, सतत तणावपूर्ण वातावरण असेल किंवा नकारात्मक उर्जामुळे तुम्ही त्रस्त असाल तर विजयादशमीच्या दिवशी काही सांगितलेले उपाय करून पहा. यासाठी तुम्हाला काही विशेष करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला झाडाशी संबंधित उपाय करावे लागतील. असे मानले जाते की या झाडाचा उपाय खूप प्रभावी आहे. तर जाणून घेऊया.

अथक प्रयत्नानंतरही जर यश मिळत नसेल किंवा नशीब तुमची साथ देत नसेल तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा. नंतर त्याची काही पाने स्वतःजवळ ठेवा आणि जिथे तुम्ही जाल तिथे ही पाने रुमाल मध्ये बांधून तुमच्या बरोबर घेऊन जा. असं म्हणतात की असे केल्याने नशिबाची साथही मिळते आणि यशही मिळते.

दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्यानंतर मुंग्यांना साखर किंवा साखर मिसळलेले पीठ द्या. मानले जाते की असे केल्याने जीवनातील तणावही दूर होतो आणि देवाची कृपा राहते.

जर तुम्ही रोज काही ना काही आजाराने त्रस्त असाल तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा. यानंतर, त्याचे लहान लाकूड काळ्या धाग्याने गुंडाळा आणि स्वतःच्या गळ्यात घाला. मानले जाते की असे केल्याने आजारांपासून आराम मिळतो.

याव्यतिरिक्त जर तुम्ही नकारात्मक ऊर्जेने त्रस्त असाल तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करा आणि तुमची समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर शमीच्या काट्यांचे हवन करा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-शांती राहते असे सांगितले जाते.

Leave a Comment