वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह हा राशीप्रमाणेच नक्षत्र परिवर्तन सुद्धा कालानुरूप करत असतो. ठराविक वेळेनंतर जेव्हा एखाद्या ग्रहाचे नक्षत्र बदलते तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर कमी अधिक प्रमाणात पडत असतो. जर नक्षत्र बदलाच्या वेळी एकाच वेळी दोन ग्रह एका नक्षत्रात आले किंवा त्यांच्या परिवर्तनाच्या कक्षा एकत्रित आल्या तरी काही शुभ राजयोग निर्माण होत असतात. अशाच प्रकारे आता शनी व बुध अशा दोन ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन झाले आहे. १५ ऑक्टोबरला बुध व शनी दोघांनी धनिष्ठा व चित्रा नक्षत्रात प्रवेश घेतला आहे. यामुळे १२ राशींपैकी काही राशींच्या नशिबात प्रचंड लाभदायक व प्रगतीची स्थिती तयार झाली आहे. विशेष म्हणजे २०२३ च्या शेवटपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला यापुढील दोन महिन्यात कोणत्या रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो हे पाहूया..
शनी व बुध नक्षत्र परिवर्तन करताना ‘या’ राशींना करणार प्रचंड श्रीमंत?
कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार शनी व बुध यांच्या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ कर्क राशीला धनरूपात मिळू शकतो. तुम्हाला बँकेच्या जुन्या व्यवहारातूनच मोठ्या प्रमाणात परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आई- वडिलांनी केलेली गुंतवणूक सुद्धा याकाळात तुम्हाला धनलाभाच्या रूपात फायदेशीर ठरू शकते. या काळात मानसिक शांतीसाठी काही गोष्टी नजरेआड करणेच हिताचे ठरेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठांकडून सहकार्य लाभलायने अनेक कामे वेळीच मार्गी लागतील व तुमची प्रशंसा सुद्धा होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे पद बदलण्याचे संकेत आहेत.
सिंह रास (Leo Zodiac Horoscope)
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नक्षत्र परिवर्तनाचा लाभ सिंह राशीला आत्मविश्वासात वाढीच्या रूपात मिळू शकतो. तुमची रास ही अगोदरच अत्यंत निडर व बोलक्या स्वभावाची म्हणून ओळखली जाते. तुम्हाला नेतृत्व करण्याची आवड असते. पण या वेळेस तुमच्या आवडीला खरोखरच मार्ग मिळू शकतो, फक्त आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. धनलाभाचा मार्ग तुमच्या वाणीतून उगम पावत असल्याची चिन्हे आहेत. तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला प्रचंड पैसे प्राप्त होऊ शकतात.
मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)
शनी व बुध नक्षत्राचे परिवर्तन हे मकर राशीच्या आयुष्यात नव्या गोष्टी घडवून आणणार आहेत. अनेक गोष्टी ज्या खूप सवयीच्या झाल्या होत्या त्यांच्यातही बदल होऊ शकतो. तुम्हाला या याकाळात नव्या नोकरीची संधी मिळू शकते. वैवहिक सुख लाभण्याची चिन्हे आहेत. ज्यांना लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी स्थळ येऊ शकते तर ज्यांचे लग्न झाले आहे त्यांना नव्याने जोडीदाराशी जोडले जाता येणार आहे. तुम्हाला प्रेमाच्या रूपातून व्यवसाय व धनवृद्धी होण्याची चिन्हे आहेत. या काळात तुमच्या हितशत्रूंकडे दुलक्ष करून चालणार नाही.