नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्या घरात शांतता, समृद्धी हवी आहे…? आपली भरभराट करून घ्यायची आहे…? भरपूर पैसा-धनसंपत्ती हवा आहे..? तर करा स्वामीं समोर प्रार्थना आणि जप. मित्रांनो स्वामी समोर ही एक प्रार्थना म्हणायची आहे यामुळे आपणाला वरील सर्व प्रश्नांची उत्तरे अपेक्षित मिळतील यश लाभेल.
मित्रांनो, आपल्या देवघरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल त्या फोटो समोर मूर्ती समोर बसायचं आहे आणि आपल्याला स्वामींसमोर ही एक प्रार्थना करायची आहे. मित्रांनो ही प्रार्थना केल्यामुळे आपण स्वामीं पर्यंत पोहोचू शकतो स्वामी मध्ये आणि आपल्यामध्ये एक संवाद होऊ शकतो आणि स्वामींना आपण जास्त जवळ ओळखू शकतो. स्वामींनाही आपली ओळख आपण दाखवू शकतो. जेणेकरून स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर लगेचच पडेल.
मित्रांनो जेव्हा आपल्याला स्वामींना काहीतरी सांगायचं असेल त्यावेळेस आपण लगेच स्वामीं पर्यंत पोहोचू आणि स्वामी आपली ती प्रार्थना लगेच ऐकून घेतील. त्यासाठी आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे फोटो किंवा मूर्ती समोर बसून ही प्रार्थना नक्की बोलायचे आहे.
मित्रांनो जेव्हा आपल्याला काहीतरी इच्छा स्वामींकडे बोलून दाखवायची असेल स्वामींकडे आपल्याला काहीतरी मागायचं असेल त्यावेळेस या प्रार्थनेचा आपल्याला खूप मोठा उपयोग होईल, फायदा होईल.
आपण तर स्वामींना बोलणारच आहोत, ‘’स्वामी आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. आमच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्वकाही नांदू द्या. नोकरी, उद्योगधंदा यात यश मिळून आमच्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा यात बरकत होऊ दे.’’
हे तर आपण रोजच मागणारच आहोत पण मित्रांनो आपण ज्या काही इच्छा बोलत असतो त्यावेळेस आपल्याला एक प्रार्थना करायची आहे. मित्रांनो ही प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून आपल्याला म्हणायची आहे. मित्रांनो प्रार्थना अशी आहे…
सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षु नको गुणवंता अनंता
प्रभू नायका मागणे हेचि आता
जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ
हे स्वामी राया तुमची अशीच कृपादृष्टी आमच्यावर राहू दे, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, ही चूक परत कधीच होणार नाही. स्वामीराया आमच्यावर कृपादृष्टी ठेवून राहा अशाप्रकारे आपण स्वामींसमोर रोज रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना करायचे आहे आणि स्वामींच्या नावाचा पुढील जप मंत्राच्या नंतरच आपण करायचा आहे आणि झोपी जायच आहे.
‘ओम श्री स्वामी समर्थ आय नमः ‘
त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर सकारात्मक बदल झालेले दिसून येतील. आपल्यावर कृपादृष्टी ठेवुन राहिलेले स्वामी आणि आपल्यामध्ये एक जिव्हाळ्याचे संबंध होतील. पण मित्रांनो ही प्रार्थना आपल्याला रोज करायची आहे. नित्यनियमाने करायची आहे. यामध्ये खंड अजिबात पडू द्यायचा नाही.
मित्रांनो तुम्ही जर प्रवासामध्ये असाल किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी असाल आणि तर तुम्हाला फक्त ही प्रार्थना मनातल्या मनामध्ये म्हणायची आहे आणि झोपी जायचं आहे. ज्या ज्या वेळी शक्य असेल त्या त्या वेळी आपण स्वामींचे नामस्मरण करावे.
पण मित्रांनो प्रार्थना आपल्याकडून रोज बोलली गेली पाहिजे रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हे बोलायचं आहे म्हणजे बोलायचं आहे. असं केल्याने आपल्या जीवनातील थोड्या दिवसात आपल्या सर्व अडचणी दूर होतील. आपल्याला परिस्थितीत लगेच चचमत्कारिक फरक दिसून येईल. आपल्यावर स्वामी कृपा लगेचच होईल कारण मित्रांनो ज्याच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ, त्यांच्या जीवनामध्ये कसलाच नाही अनर्थ.
वरील माहिती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोषातून तसेच मिळालेल्या इतर शास्त्रांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये, ही विनंती.