उद्या 14 ऑक्टोंबर किती वाजता लागणार सूर्यग्रहण? या चुका अवश्य टाळा नाहीतर….

मित्रांनो,उद्या, शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 रोजी 2023 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. याशिवाय उद्या सर्व पितृ अमावस्या आहे. अशा स्थितीत सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी कधी सुरू होईल आणि ग्रहण असल्याने पितरांचे श्राद्ध, तर्पण वगैरे केव्हा व कसे करावे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

भारतीय वेळेनुसार 14 ऑक्टोबरचे सूर्यग्रहण किती वाजता होईल, त्याचा सुतक काळ कधी असेल आणि पितरांसाठी विधी कधी करता येतील हे जाणून घेऊया.

उद्या, 14 ऑक्टोबर रोजी, सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 08:34 वाजता सुरू होईल, जे मध्यरात्री 02:25 पर्यंत चालेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा सुतकही वैध राहणार नाही. हे सूर्यग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिका, अंटार्क्टिका येथे दिसणार आहे.

हे सूर्यग्रहण कन्या आणि चित्रा नक्षत्रात होईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा कुठलाच परिणाम आपल्याकडे होणार नाही. यामुळे सर्व पितृ अमावस्येला पितरांसाठी केले जाणारे श्राद्ध, तर्पण आदी विधींमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. तसेच अमावस्येच्या रात्री केलेल्या दीपदानाचा कोणताही परिणाम होणार नाही. गोंधळात न पडता, उद्या पितृ अमावस्येला तुम्ही आरामात दिपदान करावे आणि पितरांसाठी तर्पण करावे.

उद्या अमावस्येला पहाटे स्नान करावे आणि त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे केल्याने पितरं तृप्त होतात. यानंतर, आपल्या सर्व पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी नैवेद्य, दान आणि दिवे लावा. जर काही कारणास्तव तुम्हाला 16 दिवसांत श्राद्ध करता येत नसेल, तर तुम्ही ते अमावस्येला करावे कारण या दिवशी पितरं निरोप घेतात.

Leave a Comment