मित्रांनो, शारदीय नवरात्रोत्सवाला लवकरच सुरूवात होणार आहे. अंबामातेच्या भक्तांसाठी ही पर्वणीच असते. उपवास, देवीचा जागर, रास दांडियांनी रात्ररात्रभर लोक जागतात. धमाल मजा मस्ती करतात.एकमेकांना शुभेच्छा देत सत्कर्मदेखील करतात.
हिंदू धर्मात या सणांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या सणांमुळेच घरात नवचैतन्य निर्माण होतं. घरातील नकारात्मक उर्जा नाहीशी होते. घरात सकारात्मकता वाढते आणि याचा परिणाम घरातील सदस्यांवर होतो. ज्यामुळे घरातील लोकांची प्रगती होते.
नवरात्रीत प्रत्येकाच्या घरात घटस्थापना केली जाते. प्रत्येकाच्या घरात दुर्गामातेचा संचार होतो. देवीच्या येण्याने घराला शोभा येते. या नऊ दिवसात असे काही उपाय आहेत. जे केल्याने घरातील आर्थिक अडचणी नष्ट होतात. तुम्हालाही हे उपाय जाणून घ्यायचे असतील ही माहिती तुमच्या कामाची आहे.
घटस्थापना आणि दसऱ्याच्या मुहुर्तावर मोठी खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी आणलेल्या अनेक गोष्टी फलदायी ठरतात. हे तर तुम्हाला माहिती आहेच. पण नवरात्रीच्या आधी तुम्ही काही गोष्टींची खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे.
नवरात्री आधी दुर्गामातेची मूर्ती घरात आणणं विशेष फलदायी आहे. नवरात्रीत दुर्गामातेचा प्रवेश आपल्या घरी होतोच. पण ती कायमस्वरूपी रहावी यासाठीही लोक तिची प्रतिमा घरी आणतात. नऊ दिवस त्या प्रतिमेचीही पूजन केले जाते. त्यामुळे नवरात्री आधी माता लक्ष्मीचे प्रतिक असलेली प्रतीमा किंवा मूर्ती घरी आणा.
याशिवाय दुर्गा मातेच्या पावले घरी आणणं शुभ मानलं जातं. ही पावले धातूची असावीत. त्यांची देवघरात मांडणी करून रोज पूजन करावे. यामुळे भक्तांवर मातेचा आशीर्वाद राहतो आणि व्यक्तीची जीवनात खूप प्रगतीही होते.
हिंदू धर्मात वेगवेगळ्या पूजेनुसार कलशाचे महत्त्व आहे. नवरात्रीपूर्वी भाविक कलशाची स्थापना करतात. अशा स्थितीत नवरात्रीमध्ये मातीचा, पितळाचा, सोन्याचा किंवा चांदीचा कलश घरी आणा.ते शुभ राहील.
चंदनाची माळ शुभ असते. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला लाल चंदनाची माळ खूप प्रिय असते. यासोबतच नवरात्रीमध्ये भक्त दुर्गामातेच्या मंत्रांचा जप करतात. त्यामुळे या वेळी नवरात्रीमध्ये लाल चंदनाच्या माळा घरी नक्की आणा. असे केल्याने दुर्गामातेची कृपा भक्तांवर कायम राहते.
नवरात्रीच्या काळात दुर्गामातेला लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची चुनरी किंवा साडी नक्कीच अर्पण करा. यामुळे, माता दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते. जे एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या दिवसांची सुरुवात दर्शवते.