नवरात्रीत हा उपाय करून तर बघा भाग्य उजळेल!

मित्रानो, सर्वपितृ अमावस्येनंतर म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. माता दुर्गेच्या स्वगतासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. हिंदू धर्मात नवरीत्रीला विशेष महत्त्व आहे.

नवरात्रीचे 9 दिवस माता दुर्गाला समर्पित आहे. या उत्सवात माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात. तुम्हालाही माता दुर्गेची कृपा हवी असल्यास हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरु शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला अशा उपायांबद्दल सांगणार आहोत जो, दुर्गा देवीला सर्वात प्रिय आहे.

या उपायाने दुर्गा देवी प्रसन्न होत तुमचे भाग्यही उजळेल. देवी दुर्गाला लवंगाची जोडी सर्वात प्रिय आहे आणि पूजेमध्ये लवंग अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या काळात लवंगाच्या जोडीचे उपाय खूप प्रभावी मानले जातात. चला तर मग जाणून घेऊया या खास उपायांविषयी अधिक माहिती.

तुम्ही अनेक दिवसांपासून नोकराच्या शोधात आहात मात्र अपेक्षित काम मिळत नसेल, तर नवरात्रीतील उपाय प्रभावी ठरतात. नवरात्रीच्या काळात लवंगाची जोडी रोज 7 वेळा डोक्यावरुन उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा. या उपायाने नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होत तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल.

नवरात्रोत्सवात देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात 5 वेलची आणि 5 सुपारी सोबत एक लवंग ठेवा आणि देवी दुर्गेला अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे सर्व साहित्य कपड्यामध्ये गुंढाळून तिजोरीत ठेवा. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. असे केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल. तसेच देवी दुर्गेच्या कृपेने आर्थिक चणचण दूर होते.

नवरात्रीच्या 9 दिवसांत दररोज घरात लवंग आणि कापूर एकत्र जाळा. यामुळे घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते. हा उपाय रोज सकाळी 9 दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते.

राहू-केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये केलेला लवंगचा उपाय प्रभावी ठरतो. यासाठी दररोज शिवलिंगाला लवंग अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू-केतूचा अशुभ प्रभाव दूर होईल.

Leave a Comment